Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई राज्य सरकारच्या संवेदना बधिर झाल्यात, फडणवीसांचा हल्लाबोल

राज्य सरकारच्या संवेदना बधिर झाल्यात, फडणवीसांचा हल्लाबोल

शिक्षकांनी आंदोलन करावे लागत आहे हे दुर्दैवी - फडणवीस

Related Story

- Advertisement -

मुंबईतील आझाद मैदानावर मागील २१ दिवसांपासून विनाआनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास्थळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही होते. विनाअनुदानित शिक्षक आंदोलकातील शिक्षकांची त्यांनी भेट घेतली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, आम्ही शिक्षकांसाठी २० टक्के दिले नंतर ४० आणि ६० टक्क्यांचे अनुदान देण्याचे ठरविले होते. परंतु सत्ता गेल्यावर हा निर्णय घेणे जमले नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे की, शिक्षकांना दिर्घकालीन आपल्या मागण्यांसाठी तसेच ज्या मागण्या मान्य झाल्या आहेत त्याच्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. आम्ही शिक्षकांचा मुद्दा लावून धरु संसदेतही हा मुद्द उपस्थित करु असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटले की, शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही संसदेत गदारोळ करु, राज्य सरकार बधीर झाले आहे. राज्य सरकार मुंबईच्या बिल्डरांना सुट देण्यात वेळ आहे. परंतु जे शिक्षक मेहनत घेत आहेत. पिढी घडवत आहेत त्यांच्या मागण्या ऐकण्यात सरकारला वेळ नाही.

- Advertisement -

शिक्षकांना अनुदान मिळत नाही आहे. तर ज्या शिक्षकांचे अनुदान सुरु आहे त्या शिक्षकांचेही अनुदान कसे थांबवता येईल यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आम्ही काही झाले तरी खपवून घेणार नाही. काय वाटेल ते खपवून घेणार नाही. उद्या जर अवश्यकता पडली तर तुमच्या आम्ही पाठीशी उभे राहू. तुमच्या आंदोलनाला आमचा पुर्ण पाठींबा आहे. हा प्रश्न जर सरकारने सोडावला तर त्यांना आम्ही श्रेय देऊ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

- Advertisement -