Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई फडणवीसांच्या पुतण्याने घेतली होती आरोग्य कर्मचारी म्हणून लस, RTI मध्ये स्पष्ट

फडणवीसांच्या पुतण्याने घेतली होती आरोग्य कर्मचारी म्हणून लस, RTI मध्ये स्पष्ट

‘चाचा विधायक है हमारे’ लशीवरुन टीकेची झोड उठलेला फडणवीसांचा पुतण्या हेल्थकेअर वर्कर; माहितीच्या अधिकारात स्पष्ट

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या २२ वर्षांच्या पुतण्याने कोरोना लस घेतलेल्याचा फोटो व्हायरल झाला. यावरुन देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. तन्मय फडणवीस असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याचे नाव. काही दिवसांपूर्वी ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तन्मय फडणवीसने कोरोनावरील लस वयाच्या मर्यादेत बसत नसतानाही त्याने घेतली होती. तन्मय फडणवीसच्या ट्विटर अकाऊंटवर त्याने अभिनेता असल्याचे नमुद केल्याचे दिसत असून त्याने काही मालिकांमध्ये प्रत्यक्षात भूमिकाही साकारली आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या तरुण पुतण्याने आधीच लस घेतल्यामुळे सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, राज्य सरकारकडे लस घेत असताना हेल्थकेअर वर्कर म्हणून त्याने उल्लेख केला असल्याची माहिती माहितीचा अधिकारात (RTI) प्राप्त झाली आहे.

काँग्रेसचा हल्लाबोल

- Advertisement -

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा तरुण पुतण्या तन्मयने लस घेतलेल्याचा फोटो व्हायरल झाला होता.  तेव्हा काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आले होते. फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? असा सवाल काँग्रेसने केला आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मयने नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावरील लस घेतलेल्याचा फोटो त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. हा फोटो काँग्रेसने शेअर करत फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!” असं ट्विट करत काँग्रेसने फडणवीस यांना लक्ष्य केले होते.

कोण आहेत तन्मय फडणवीस?

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे असून माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस आहे. त्याने अभिनेता असल्याचा ट्विटरवर उल्लेख केल्याचे पाहायला मिळत आहे. यासह नागपूरातील पब्लिक फिगर असे इन्स्टाग्राम बायोमध्ये मेन्शन केल्याचे दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanmay Fadnavis (@tanmayfadnavis)

 

 

 

- Advertisement -