घरमुंबईआता मध्य रेल्वे करणार मोबाईल चार्जिंगचा धंदा

आता मध्य रेल्वे करणार मोबाईल चार्जिंगचा धंदा

Subscribe

 20 मोबाइल कियोस्क चार्जिंग मशीन बसविणार

मध्य रेल्वे मार्गावर 20 अत्याधुनिक डिजिटल मोबाइल कियोस्क चार्जिंग मशीन बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोबाईल चार्जिग मशीन जवळ बसण्याची गरज भासणार नाही. कारण या मशिनीला इलेक्ट्रॉनिक लॉकर असणार आहे. सोबतच मोबाईलची चार्जिंग सूध्दा जलद गतीने होणार आहे. या सुविधेसाठी प्रवाशांनाकडून 10 रुपये प्रतितास आकारण्यात येणार आहे. यामशिनी खासगी कंपनी कडून चालविण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेकडून रेल्वे प्रवाशांना उत्तम सुविधा देण्याचा सतत प्रयत्न सूरू आहेे. यापूर्वी रेल्वे प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंटची सुविधा मध्य रेल्वेने दिली होती. ही सुविधा प्रवाशांसाठी नि:शुल्क होती. आता ही सुविधा प्रवासी संख्येच्या तुलनेत अपुरी पडत होती. सोबतच चार्जिंग पॉईंटवर सुद्धा सतत तांत्रिक बिघाड येत असल्याने आता मध्य रेल्वेने एका खासगी कंपनीला मोबाईल चार्जिर्ंग व्यवयसाय करण्याची अनुमती दिली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या मार्गावर 20 अत्याधुनिक डिजिटल मोबाइल कियोस्क मशीन लावण्यात येणार आहेत. यापूर्वी भारतीय रेल्वेतील पहिली डिजिटल मोबाइल कियोस्क मशीन पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद रेल्वे स्थानकावर लावण्यात आली होती. त्यानंतर मध्य रेल्वेची पहिली आणि भारतीय रेल्वेची दुसरी मशीन ही मध्य रेल्वेच्या पुणे विभागात लागणार आहे. प्रत्येक मशीनमध्ये 24 लॉकर सोबतच 20 डिजिटल मोबाईल कियोस्क मशीन असणार आहेत. या 20 मशिनपैकी 10 पुणे रेल्वे स्थानकांवर लावण्यात येणार आहे. उर्वरित मशीनपैकी प्रत्येकी 2 कियोस्क मशीन कोल्हापूर, मिराज, शिवाजीनगर, पिंपरी आणि चिंचवड स्थानकांत बसविण्यात येणार आहेत. या कियोस्क मशिनमुळे मध्य रेल्वेला प्रतिवर्ष 2. 6 लाख रूपयांच्या महसूल मिळणार आहे.

- Advertisement -

अशी मिळणार सुविधा ?
अत्याधुनिक डिजिटल मोबाइल कियोस्क मशीनवर प्रवासी स्वत: चार्जिंग करू शकतात. या मशीनवर 19 इंचाची एलसीडी स्रिन असणार आहे. मोबाईल चार्जिंग करतपर्यंत तुम्ही रेल्वेच्या मनोरंजक जाहिराती या एलसीडी स्क्रिनवर बघू शकता. मोबाइल फोन चार्जिंग स्टेशनला चार्जिंग बॉक्स लॉकर असणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा फोन इलेक्ट्रॉनिक लॉकरच्या आत मोबाईल फोनला टाकू शकतो. त्यामुळे तुमचा फोन सुरक्षित राहणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

प्रवाशांच्या मोबाईल चार्जिंगच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने 20अत्याधुनिक डिजिटल मोबाइल कियोस्क मशीन लावण्यात येणार आहे. यापैकी 10 मशिन फक्त पुणे रेल्वे स्थांकावर लावण्यात येणार आहे. हे मध्य रेल्वेची पहिली आणि भारतीय रेल्वेतील दुसरी मशिन ठरणार आहे.यांच्या मोठया प्रमाणात प्रवाशांना आणि रेल्वेला मोठा फायदा होर्ईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -