घरमुंबईमुदतबाह्य औषधांची नियमानुसार विल्हेवाट; पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट

मुदतबाह्य औषधांची नियमानुसार विल्हेवाट; पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट

Subscribe

मुदतबाह्य औषधांची विल्हेवाट लावण्यासाठी औषधांचे वेष्टन काढण्यात येऊन औषधांची विल्हेवाट लावण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

स्थायी समिती सभापती नवीन गवते यांनी माता बाल हॉस्पीटल, बेलापूर येथे केलेल्या पाहणी दौऱ्यामध्ये मध्यवर्ती औषध भांडार गृहास दिलेल्या भेटीत एका खोलीत मुदत बाह्य औषधे विनावेष्टन आढळून आल्याचे वृत्त विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. यावर मुदतबाह्य औषधांची विल्हेवाट लावण्यासाठी औषधांचे वेष्टन काढण्यात येऊन औषधांची विल्हेवाट लावण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

औषधांच्या विल्हेवाटासाठी कंत्राटदाराला पाचारण

वास्तविकणे ‘राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान’ ह्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिकेस विविध प्रकारची औषधे २०१५-१६ मध्ये प्राप्त झाली होती. प्राप्त झालेल्या औषधांपैकी टॅबलेट क्लोरोक्वीन फॉस्फेट आय.पी. २५० मिलीग्रॅम ह्या औषधांचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त प्रमाणात करण्यात आला होता. महापालिकेच्या मध्यवर्ती औषधगृहामार्फत ही औषधे नवी मुंबई महापालिकेच्या सर्व हॉस्पीटल्सना व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना मागणीनुसार वितरीत करण्यात येत होती. हॉस्पीटलमध्ये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही औषधे मुदतबाह्य होण्यापूर्वी वापरण्यात येत होती.
तथापि औषध पुरवठा जास्त झालेल्या मुदतबाह्य होणाऱ्या औषध साठ्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयातील खरेदी कक्षाचे सह संचालक यांना विचारणा करण्यात आली होती. तथापि याबाबत कोणतेच अभिप्राय प्राप्त न झाल्यामुळे मुदतबाह्य औषधे नष्ट करण्याबाबत मे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांना कळविण्यात आले.

- Advertisement -

औषधांचे वितरणच केले नाही

हा मुदतबाह्य औषध साठा माता बाल रुग्णालय बेलापूर येथील औषध गृहात मुदतबाह्य औषधे ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खोली क्रमांक २४ मध्ये स्वतंत्रपणे ठेवण्यात आला होता. सदरचा साठा महापालिका हॉस्पीटलना व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरीत करण्यात आलेला नाही. हा साठा स्ट्रीप्समध्ये असल्यामुळे गोळ्या वेष्टनातून वेगळ्या करुन मे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांना त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी देण्याची कार्यवाही सुरु होती.

नियमानुसार औषधांची विल्हेवाट

याच काळात २ जुलै रोजी स्थायी समिती सभापती यांनी बेलापूर माता बाल रुग्णालयास भेट दिली. यावेळी मुदतबाह्य औषधे ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी खोली क्रं. २४ त्यांनी उघडण्यास सांगितली. त्या ठिकाणी मुदतबाह्य औषधसाठा नष्ट करण्यासाठी ठेवण्यात आला होता. केवळ मुदतबाह्य औषधांची विल्हेवाट लावण्याकरीता मे.मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांना देण्यासाठी औषधे वेष्टनापासून वेगळी करण्यास सुरुवात करण्यात आली होती. स्थायी समिती सभापतींच्या दौऱ्यामध्ये मुदतबाह्य औषधे सापडल्याबाबत वृत्त प्रसिध्द झाले आहे. मात्र सदरची औषधे विल्हेवाट लावण्यासाठी वेगळी ठेवण्यात आली होती. अशा प्रकारची मुदतबाह्य झालेली कोणतीही औषधे नवी मुंबई महापालिकेच्या हॉस्पीटलमध्ये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना दिली जात नाहीत. मुदतबाह्य औषधे नष्ट करण्याच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे या मुदतबाह्य औषधांची सुद्धा विल्हेवाट लावण्यात आली असून आरोग्य विभागामार्फत योग्य पद्धतीने नियमानुसार कार्यवाही केली जात असल्याचे नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -