घरमुंबईडॉ. लहाने यांच्या हस्ते उत्कृष्ट वैद्यकीय अध्यापक पुरस्काराचे वितरण

डॉ. लहाने यांच्या हस्ते उत्कृष्ट वैद्यकीय अध्यापक पुरस्काराचे वितरण

Subscribe

शिक्षक दिनानिमित्त, 17 सप्टेंबर 2019 रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील बारा वैद्यकीय अध्यापकांचा ‘उत्कृष्ट वैद्यकीय अध्यापक’ हा पुरस्कार देऊन मंगळवारी सत्कार करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अध्यापक हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच रुग्णसेवेचे कार्य अव्याहत करत असतात.

ही दोन्ही महत्वाची कार्ये करत असताना त्यांची कधीही तक्रार नसते. त्यांच्या या कामाचे कौतुक व्हावे यासाठी संचालनालयामार्फत मागील वर्षापासून 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय वैद्यकीय अध्यापकांचा सत्कार करण्यास सुरुवात झाली.

- Advertisement -

यंदाच्या वर्षी पुणे येथील डॉ. सुदेश गंधम, डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, डॉ. राजेश आंबुलगेकर, डॉ. वर्णन व्होलो, डॉ. अबरार अहमद, डॉ. जीवन वेदी, डॉ. किशोर इंगोले, डॉ.ब्रजेश गुप्ता, डॉ. सुरेंद्र गवारले, डॉ.नितीन अंभोरे, डॉ. मारुती पोटे, डॉ.अमोल दुबे यांचा सत्कार करण्यात आला. वैद्यकीय अध्यापकांचा सत्कार वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे व सहसंचालक(दंत) डॉ. विवेक पाखमोडे यांच्या हस्ते करण्यात आला.

डॉ. तात्याराव लहाने यांनी शिक्षकांनी चांगले गुण अंगी बाळगून मुलांना चांगले शिक्षण व चांगली वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास उपस्थित वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आजच्या सत्कार मुर्तींप्रमाणे भविष्यात उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट डॉक्टर्स होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -