घरमुंबईमुंबईत 'या' कालावधीत मद्यविक्री बंद ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

मुंबईत ‘या’ कालावधीत मद्यविक्री बंद ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Subscribe

१९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते २१ ऑक्टोबर पर्यंत पुर्ण दिवस या कालावधीत मद्यविक्री होणार नाही. तसेच २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी दिवशी मद्य विक्रीवर प्रतिबंध

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ खुल्या, मुक्त, निःपक्षपातीपणे तसेच निर्भीय वातावरणात पार पाडण्यासाठी १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते २१ ऑक्टोबर पर्यंत पुर्ण दिवस या कालावधीत मद्यविक्री होणार नाही. तसेच २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी दिवशी मद्य विक्रीवर प्रतिबंध ठेवण्याचे आणि मद्य विक्रीच्या सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री जोंधळे यांनी दिले आहेत.

त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ची मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी संबंधी जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच निवडणूक सुरळीतपणे आणि खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देश व उपरोक्त देशी विदेशी इतर नियमावलीतील तरतुदीनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मुंबई जिल्ह्यातील सर्व संबंधित मद्य विक्रीच्या, ताडीच्या इतर संबंधित अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे देखील आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : ऑक्टोबरमध्ये ८ दिवस ‘ड्राय डे’ने तळीरामांची पंचाईत

शासन अधिसूचना, गृह विभाग क्र. बीपीए-२०१४ /१२५९/१/ इएक्ससी-३ १२ जुलै १९१९ अन्वये सुधारित केलेल्या महाराष्ट्र देशी दारू नियमावली १९३७ च्या नियम क्रमांक २६ (१) सी (१) व (२), महाराष्ट्र मद्य नियमावली १९६९ च्या नियम ९ अ (२) सी (१) आणि (२) तसेच महाराष्ट्र ताडी (अनुज्ञप्त्या देणे) आणि (ताडी छेदणे) नियमावली १९६८ च्या नियम ५ (अ) (१) आणि (२) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ (१) मधील तरतूदी नुसार अनुक्रमे एफएल-१, एफएल-२, एफएल-३, एफएल/बीआर-२, सीएल-२, सीएल-३, ताडी इत्यादी संबंधित सर्व अनुज्ञप्त्या निवडणुकीच्या कालावधीत बंद ठेवण्याचे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ सी अन्वये तरतूद करण्यात आली आहे.

मतदान तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई

संबंधित अनुज्ञप्तीधारक या आदेशाचे उल्लंघन करून मद्याची विक्री करीत असल्याचे आढळल्यास, ते धारण करीत असलेली अनुज्ञप्ती कायम स्वरूपी रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -