घरमुंबईमीरारोडमधील हटकेश चौकातील रस्ता खचला

मीरारोडमधील हटकेश चौकातील रस्ता खचला

Subscribe

मीरारोडमधील हटकेश येथील भरचौकातील रस्ता मंगळवारी अचानक खचल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. हा रस्ता दोन महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आला होता. त्यामुळे रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे केले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मीरारोड येथील हटकेशच्या मुख्य चौकातील रस्ता अचानक खचला आहे. या चौकाच्या बाजूलाच लोढा या विकासकाच्या इमारतीच्या कामासाठी पायलिंगचे काम दिवसरात्र सुरू आहे. या कामामुळे आजुबाजूच्या इमारतीला मोठे हादरे बसत आहेत. तसेच त्या चौकाच्या दुसर्‍या बाजूलाच गटाराचे काम सुरू आहे. हे काम ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. जो रस्ता खचला तो रस्ताही दोन महिन्यापूर्वीच बनवला असल्याचे तेथील नागरिक सांगत आहेत. हा रस्ताही ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचा बनवला असल्यामुळेच तो खचल्याचा आरोप केला जात आहे.

- Advertisement -

ज्या वेळेस रस्त्याचे किंवा गटाराचे काम महापालिका अभियंत्याच्या देखरेखीखाली करणे आवश्यक आहे. परंतु असे होताना दिसत नाही. त्यामुळेच ठेकेदार रात्रीही कामे करत आहेत. हा रस्ता बनवताना योग्य प्रमाणात दगड वापरले नाही. त्यामुळे रस्त्याच्यामध्ये पोकळी निर्माण झाली व रस्ता खचला असे सांगितले जाते. हा मुख्य रस्ता असल्याने यावरून वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते. रस्त्यावरून चार चाकी वाहने, शाळेच्या बस मोठ्या प्रमाणात जातात. सुदैवाने रस्ता खचला त्यावेळेस शाळेची बस किंवा इतर वाहन तिथे नव्हते अन्यथा मोठा अपघात घडला असता. रस्ता खचल्यानंतरही महापालिका अधिकारी, कर्मचारी काही तास झाल्यानंतरही तिकडे फिरकले नाहीत. अग्निशमन दलाची गाडीही उशिरा पोचली. या प्रभागात चार नगरसेवक आहेत. ते कोणीही फिरकले नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -