घरताज्या घडामोडीCoronavirus: डोंबिवलीतील रिक्षावाले काकांची माणूसकी, सर्वत्र होतंय कौतुक

Coronavirus: डोंबिवलीतील रिक्षावाले काकांची माणूसकी, सर्वत्र होतंय कौतुक

Subscribe

डोंबिवलीतील एका रिक्षाचालकाने कोरोनाच्या संकटातही माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण स्थापित केले आहे.

कोरोनाबाधित रूग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टर, नर्स, वैद्यकिय क्षेत्राशी निगडीत व्यक्ती सफाई कर्मचारी, पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी हे योध्दे अहोरात्र काम करीत असतानाच, डोंबिवलीतील रिक्षा चालक रूपेश रेपाळे हे सुध्दा पोलीस, गोरगरीब आणि गरजू रूग्णांना रूग्णालयात नेण्यासाठी विनामूल्य रिक्षाची सेवा देत आहे. एकीकडे कोरोनाने लोकांमधील माणुसकीचा झरा आटत असल्याच्या घटना वारंवार समोर येत असतानाच, दुसरीकडे मात्र डोंबिवलीतील एका रिक्षाचालकाने या सर्व घटनांना छेद देत माणुसकी अजूनही जिवंत असल्याचाच दाखला आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे.

डोंबिवली पूर्वेत राहणारे रुपेश रेपाळ हे रिक्षाचालक गरीब आणि गरजू लोकांसाठी देवदूतच ठरले आहेत. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार,वाहतूक बंद आहे. एखादा आजारी रूग्णाला रूग्णालयात न्यायचे असेल तर त्याला कसे नेणार? असा यक्षप्रश्न गरीब लोकांसमोर उभा ठाकतो. मग अशावेळी रिक्षावाले रेपाळे काका हे अक्षरशः देवदूतासारखे लोकांच्या मदतीला धावून येत आहेत. त्यांनी आपल्या रिक्षावर पोलीस डॉक्टर कर्मचारी आणि रूग्ण यांच्यासाठी मोफत सेवा अस रंगवून घेतलं आहे. त्यासोबत त्यांचा मोबाईल नंबरही दिला आहे. काका लोकांकडून एक रुपयाही न घेता माणुसकीच्या धर्मातून केवळ आणि केवळ चोवीस तास समाजसेवा करत आहेत.

- Advertisement -

dombivli auto rikshaw man 1

काकांची घरची परिस्थितीही जेमतेम बेताचीच असतानाही स्वतःच्या खिशातून ते ही सर्व समाजसेवा करता आहेत. यासाठी त्यांना स्थानिक नगरसेवक, समाजसेवक आदींची मदतही मिळत आहे.या काकांनी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेक गरजूंना मुंबई, ठाणे, उपनगर च्या रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या त्या परिसरात राहणाऱ्या रुग्णालयात ने -आण केली आहे. यामध्ये विविध प्रकारचे पेशंट असल्याचे काका सांगतात. मात्र आपल्या वडिलांच्या या समाजसेवेने त्यांची मुलगी श्रवणी हीदेखील भारावून गेली आहे आणि आपल्या वडिलांच्या या समाजसेवेबाबतच्या भावना आपल्या खास चित्रातून व्यक्त केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -