घरमुंबईCyclone Tauktae : उगाच धाडस करत घराबाहेर पडू नका, महापौरांचे मुंबईकरांना आवाहन

Cyclone Tauktae : उगाच धाडस करत घराबाहेर पडू नका, महापौरांचे मुंबईकरांना आवाहन

Subscribe

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईवर तौक्ते चक्रीवादळाचं संकट घोंघावत आहे. रविवारी रात्रीपासून मुंबईसह किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे वाहत असून पावसानेही दमदार हजेरी लावली आहे. या तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमी मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील काही भागांची पहाणी केली. यावेळी त्यांनी वरळी सी फेस आणि गेट वे ऑफ इंडिया भागात हजेरी लावली. तौक्ते चक्रीवादळ व पावसाची सुरु असलेली सततधार लक्षात घेता, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज वरळी सी फेस येथे पाहणी व आढावा घेतला. यावेळी मुंबईकर नागरिकांनी उगाच धाडस करत अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन केले.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -