घरमुंबईक्षयरुग्णालय प्रकरणी डॉ. अमर पवार यांचा राजीनामा

क्षयरुग्णालय प्रकरणी डॉ. अमर पवार यांचा राजीनामा

Subscribe

शिवडीच्या क्षयरुग्णालयातील परिचारिका आंदोलन प्रकरणाचे तीव्र पडसाद पालिकेत उमटल्यानंतर या प्रकरणी शिवडी क्षयरुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर पवार यांनी राजीनामा दिला आहे.

एकीकडे टीबी रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांची संख्या कमी होत आहे. तर दुसरीकडे शिवडी टीबी रुग्णालयातील नर्स स्टाफच्या युनियनबाजीमुळे डॉक्टरांवर सध्या हतबल होण्याची परिस्थिती ओढवली आहे. शिवडीच्या क्षयरुग्णालयातील परिचारिका आंदोलन प्रकरणाचे तीव्र पडसाद पालिकेत उमटल्यानंतर या प्रकरणी शिवडी क्षयरुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर पवार यांनी राजीनामा दिला आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ललितकुमार आनंदे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र, हा राजीनामा अद्याप अधिकृत पद्धतीने आपल्या पर्यंत आलेला नाही, असे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आनंदे यांनी स्पष्ट केले.

माझ्याकडे अजूनही काहीच अधिकृत राजीनामा आलेला नाही. शिवाय, या प्रकरणानंतर डॉ. पवार यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकलेला नाही. डॉ. अमर हे फक्त इथे काम करत होते. आता या परिस्थितीत फक्त मुलांना योग्य उपचार मिळणं आणि त्यांचा जीव वाचणं हेच जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी सर्वच लोकांनी नीट चर्चा केली पाहिजे. एकत्र येऊन काम केलं पाहिजे.तरचं त्या मुलांना योग्य उपचार मिळतील. “
– डॉ. ललितकुमार आनंदे, अधीक्षक, शिवडी टीबी हॉस्पिटल

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण ?

२१ सप्टेंबर या दिवशी शिवडी टीबी रुग्णालयातील नर्स आणि स्टाफ मुलांना त्रास देत असल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांनी समोर आला होता. त्यांना वेळेवर जेवण नाही, त्या मुलांची ड्रेसिंग नाही, अशा‌ अनेक तक्रारी या वेळेस मुलांच्या पालकांनी केल्या आहेत. शिवाय नर्स मुलांसह पालकांना ही शिव्या देऊन बोलतात, असा ही आरोप पालकांनी केला होता. या प्रकरणी पालिका प्रशासनाने चार नर्सवर कारवाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच या निषेधार्थ नर्सनी संप पुकारला. अचानक सुरू झालेल्या या संपामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. या संपूर्ण प्रकाराचे पडसाद पालिकेत उमटले. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमर पवार यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चांणा उधान आलं आहे. तसंच, पालिकेने याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून लेखी स्पष्टीकरण मागितले आहे. दरम्यान, बालक्षयरुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरु असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -