घरमुंबईभुयारी पार्किंग प्लाझाच्या खोदकामामुळे जलकुंभाला धोका?; ठाणेकरांमध्ये भिती

भुयारी पार्किंग प्लाझाच्या खोदकामामुळे जलकुंभाला धोका?; ठाणेकरांमध्ये भिती

Subscribe

ऐतिहासीक गावदेवी मैदानाच्या जागेवर भूमिगत पार्किंगचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. पार्किंगसाठी मैदानाचा बळी नको, अशी मागणी करीत ठाणेकरांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला होता.

ऐतिहासीक गावदेवी मैदानाच्या जागेवर भूमिगत पार्किंगचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. पार्किंगसाठी मैदानाचा बळी नको, अशी मागणी करीत ठाणेकरांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला होता. मात्र हा विरोध डावलून जोमाने कामाला सुरूवात झाली आहे. भुयारी पार्किंगसाठी साधारण ३० फूट खोदकाम होणार आहे. त्यामुळे मैदानाच्या शेजारी असलेल्या पालिकेच्या जलकुंभाला धोका होऊन भविष्यात दुर्घटना होण्याची भिती ठाणेकरांमध्ये व्यक्त होत आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात वाहने पार्क करण्यासाठी जागा नसल्याने स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या गावदेवी मैदानावर स्मार्ट सिटीतंर्गत भुयारी पार्किंग प्लाझा उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मैदानाचे क्षेत्रफळ ६ हजार २०० चौरस मीटर आहे. साधारण साडेचार हजार चौरस मीटर जागेत भुयारी वाहनतळ उभारले जाणार आहे. याठिकाणी अडीचशे वाहनांच्या पार्किंगची सोय असणार आहे. मात्र मैदानात भुयारी वाहनतळ उभारून, हे मैदान खेळाडूंपासून हिरावले जाणार असल्याने शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी पालिकेच्या निर्णयाला विरोध दर्शविला. मात्र ठाणेकर नागरिकांचा विरोध डावलून पालिका प्रशासनाकडून एका खासगी कंत्राटदाराला काम देण्यात आले आहे. कंत्राटदाराने कामास सुरूवातही केली असून मैदानात खोदकाम सुरू आहे. त्यामुळे सध्या मुलांना खेळावं कुठे ? असा प्रश्न पडला आहे. गावदेवी मैदानाच्या शेजारीच पालिकेचा २.२५ दशलक्षलीटर जलकुंभ आहे. शहरातील बहुतांशी भागात या जलकुंभातून पाणी पुरवठा होत आहे. तसेच आजूबाजूला इमारती व दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र भुयारी पार्किंगसाठी मैदानात सुमारे २० फूट खोल खोदले जाणार आहे. या खोदकामामुळे जलकुंभाला तडे जाण्याची अथवा भविष्यात धोका निर्माण होण्याची भिती शहरातील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. शहरातील नागरिकांनी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्षही वेधेल आहे. पण सगळ्या बाजूंचा विचार करूनच हा पार्किंग प्लाझा उभारण्यात येत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे ठाणेकरांमध्ये नाराजीचा सूर आहे.

- Advertisement -

काय आहे प्रशासनाचे म्हणणे …

मैदानात भुयारी पार्किंग प्लाझा साकारण्यात येणार असला तरी सुध्दा मैदान वाचणार आहे. जलकुंभ आणि आजबाजूच्या सगळया गोष्टींचा विचार करूनच हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात कोणाताही धोका उद्भवणार नाही, असे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

गावदेवी मैदानाला ऐतिहासीक महत्व आहे. शहरात मोजकीच मैदान उरली आहेत. त्यात गावदेवी मैदानही खेळाडूंपासून हिरावल गेलं तर खेळाडूंनी खेळायचं कुठे?, असा प्रश्न आहे. मैदान वाचावं, या उद्देशाने न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र मैदान वाचणार असे अॅफिडेव्हिड महापालिकेन कोर्टात सादर केलं आहे. तसेच जलकुंभासंदर्भातही विचार केल्याचं कोर्टात स्पष्ट केलय. पार्किंग ही गंभीर समस्या आहे. पण ती शहराबाहेर राबवली पाहिजे. त्यासाठी पार्किंग पॅालिसी महत्वाची आहे. गावदेवी मैदान हा परिसर स्टेशनजवळच असून हा दाटीवाटीचा भाग आहे. येथील रस्ते अरूंद आहेत. त्यामुळे हा प्रकल्प साकारल्यानंतर नियाेजन होणं महत्वाच आहे. अन्यथा भविष्यात त्याचा खूपच त्रास सहन करावा लागेल.
– डॉ महेश बेडेकर, याचिकाकर्ते

- Advertisement -

कोट्यवधी रूपये खर्च करून तयार होणारे वाहनतळ केवळ ३५० नागरिकांच्या पार्किंगचा प्रश्न सोडवणार आहे. पण खासगी वाहनांमुळे या परिसरात वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडणार आहे. तसेच मैदानातील खोदकामामुळे लगत असलेला जलकुंभ खचून दुर्घटना होऊ शकते अशी गंभीर भिती वाटते. पालिका प्रशासनाचे याकडं लक्ष वेधले पण त्यांच्याकउून कोणतच उत्तर मिळालं नाही.
– महेंद्र मोने, आरटीआय कार्यकर्ते

मैदानातील भुयारी पार्किंगवर पालिकेकडे अनेक आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. जमिनीखाली अंधार काेठडीत हे पार्किंग होणार आहे. त्याठिकाणी उजेड, हवा जाणार नाही. तसेच जमिनीखाली पेट्रोल डिझेलची वाहने उभी करणे धोकादायक आहे. तांत्रिकदृष्ट्या जलकुंभाला धोका नसला तरी जमिनीच्या खाली दगड लागला तर ब्लास्टींग केल्यांनतर धोका होणार आहे.
– सुलक्षणा महाजन, शहरचना तज्ज्ञ

हेही वाचा –

उद्धव ठाकरेंनी पुन्हा बोलावली आमदारांची बैठक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -