घरदेश-विदेशफटाक्यांमुळे देशभरात वातावरण गढूळ, मुंबईसह अनेक राज्यात हवेची गुणवत्ता ढासाळली

फटाक्यांमुळे देशभरात वातावरण गढूळ, मुंबईसह अनेक राज्यात हवेची गुणवत्ता ढासाळली

Subscribe

मुंबई – रविवारपासून भारतात मोठ्या प्रमाणात आतषबाजी झाली आहे. रविवारी झालेली भारत पाकिस्तान मॅच आणि सोमवारी झालेली दिवाळी या दोन्ही दिवशी मेट्रो शहरांत फटाक्यांची जोरात आतषबाजी झाली. त्यामुळे मंगळवारी सकाळी देशभरातील हवेची गुणवत्ता घसरली आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या गुणवत्तेवर नजर ठेवणाऱ्या सरकारी संकेस्थळाने दिलेल्या आकडेवारीनुसार, दिवाळीनंतर हवा गुणवत्ता निर्देशांक फार वाईट होता. दिल्लीत हवेची पातळी ३०१-४०० च्या दरम्यान होती. अशा प्रदुषणात दिर्घकाळ राहिल्यास आजार उद्भवण्याची शक्यता असते. दिल्लीसह इतर मेट्रो शहरांतही हवेची गुणवत्ता ढासाळली आहे. मुंबई, बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता येथील हवेच्या गुणवत्तेची माहिती घेऊया.

हेही वाचा – फटाक्यांच्या धुराने दिल्लीची हवा बिघडली, आतषबाजीमुळे वायू प्रदूषण वाढले

- Advertisement -

मुंबई

देशाची राजधानी दिल्लीत सर्वाधिक वायू प्रदूषण झाले असून देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही वायू प्रदुषणात वाढ झाली आहे. जानेवारीपासून सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी मुंबईतील विविध भागात हवा पातळी २०० च्या वर होती. तर, काही भागात हवा पातळी २०० च्या खाली होती.

बेंगळुरू

दिवाळीनंतर कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील हवेची गुणवत्ता स्थिर किंवा समाधानकारक श्रेणीत राहिली. काही ठिकाणी फटाके फोडल्याने हवा खराब झाल्याच्याही बातम्या आल्या आहेत. मात्र, इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत येथील परिस्थिती चांगली होती.

- Advertisement -

चेन्नई

दिवाळीनंतर तामिळनाडूच्या राजधानीत AQI खूप वाढला आहे. येथील अनेक भागात धुकेही दिसून आले. CPCB च्या आकडेवारीनुसार, चेन्नईतील AQI खराब श्रेणीत राहिला. अलंदूर बस डेपो ते रोयापुरम पर्यंत AQI 200-250 दरम्यान नोंदवले गेले. इतर काही भागात ते 200 च्याही खाली होते.

कोलकाता

कोलकाता, पश्चिम बंगालमध्ये सीतारंग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. येथे फटाक्यांची आतषबाजी होऊनही सोसाट्याच्या वाऱ्यामुळे प्रदूषण थांबले नाही. बर्‍याच भागात AQI 30 ते 60 च्या श्रेणीत नोंदवले गेले, जे चांगल्या हवेच्या गुणवत्तेची श्रेणी दर्शवते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -