घरCORONA UPDATECoronaVirus - ऐन संकटाच्यावेळी राजकीय, सामाजिक संस्थांच्या रुग्णवाहिका गायब!

CoronaVirus – ऐन संकटाच्यावेळी राजकीय, सामाजिक संस्थांच्या रुग्णवाहिका गायब!

Subscribe

कोरोनाग्रस्तांचा भार शासन आणि महापालिकांच्या रुग्णवाहिकांवरच

मुंबईत  कोरोनाच्या रुग्णांची नियंत्रणात आणण्यात महापालिकेला यश येताना दिसत नाही. दिवसेंदिवस ही संख्या वाढत असताना, या रुग्णांना रुग्णालय तसेच क्वारंटाईनमध्ये वाहून नेण्यासाठी रुग्णवाहिकांची संख्या अपुरी पडताना दिसत आहे. शिवसेनेनेसह अनेक सामाजिक संस्थांच्या रुग्णवाहिका एरव्ही रस्त्यांवर धावताना दिसत असल्या तरी करोनाच्या रुग्णांना भार शासनाने राबवलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकाच उचलत आहेत. महापालिका व शासनाच्या या रुग्णवाहिकांशिवाय सध्या कोणत्याही संस्थांच्या रुग्णवाहिका कामाला येताना दिसत नसून या सेवभावी वृत्तीचे प्रदर्शन घडवणाऱ्या संस्थांच्या रुग्णवाहिका ऐन संकटाच्यावेळी बंद करून ठेवल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा हजार पार करून पुढे गेला आहे. दरदिवशी आता शंभर ते दीडशे रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त आढळून आल्यानंतर निकट संपर्कातील संशयित कोरोनाग्रस्तांना रुग्णांना नेण्यासाठी महापालिकेच्यावतीने आजही शासनाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांचाच वापर केला जातो. हेल्पलाईनवर करोनाग्रस्तांची माहिती मिळाल्यानंतर तसेच बाधित क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांच्या निकट संपर्कात येणाऱ्या नागरिकांना थेट क्वारंटाईनमध्ये हलवले जाते. मात्र हे क्वारंटाईनमध्ये नेताना रुग्णवाहिकेची समस्या कायमच आहे. बऱ्याच वेळा संशयित रुणांची तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यासाठीही रुग्णवाहिकेची सुविधा नाही. एका वॉर्डात केवळ एक ते दोनच रुग्ण वाहिक असल्यामुळे बऱ्याच वेळा वैद्यकीय चाचणीनंतर निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर घरीच राहण्याचे  निर्देश दिले जाते. परंतु या रुग्णांना होम क्वारंटाईनसाठी पाठवतानाही रुग्णवाहिकेसाठी प्रतीक्षा यादी तयार करण्यात येते. त्यामुळे निगेटिव्ह आल्यानंतरही रुग्णवाहिकेने घरी सोडण्यासाठी कधी कधी  प्रतीक्षा यादी एवढी असते की संशयित रुग्णांना अनेक तासांनी घरी पोहोचण्याचे स्वप्न साकार होते.

- Advertisement -

मुंबईत शासनाच्या १०८ हेल्पलाईनवरील रुग्णवाहिका व महापालिका रुग्णालयाच्या रुग्ण वाहिका आहेत. परंतु या व्यतिरिक्त प्रत्येक रुग्णालयाबाहेरील विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या रुग्णवाहिका उभ्या असतात. एरव्ही सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडवणाऱ्या रुग्णवाहिका सध्या गायब झाल्यामुळे शासन व महापालिकेच्या रुग्णवाहिकेवरच या कोरोनाग्रस्तांचा भार उचलला जातो. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत बोलतांना, आम्ही काही सामाजिक संस्थांच्या रुग्णवाहिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी असमर्थता दर्शवली आहे. सध्या विभागातील अनेक रुग्णवाहिका रस्त्यांवर बंद करून ठेवलेल्या आहेत, पण खऱ्या अर्थाने त्यांची गरज आहे, तेव्हा त्याचा उपयोग होत नाही, याबाबतही खंत व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -