घरमुंबईवसईत तरण तलावात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

वसईत तरण तलावात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

Subscribe

वसई-विरार महापालिकेच्या तरणतलावाने एका आठ वर्षीय बालकाचा बळी घेतल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. त्यामुळे या तलावाची व्यवस्था पाहणार्‍या ठेकेदारासह पालिकेच्या अधिकार्‍यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी महापलिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

वसईच्या पश्चिमेकडील पंचवटी नाक्यावर महापालिकेचा तरणतलाव आहे. या तलावात पोहण्याची मजा घेण्यासाठी लाडवा कुटुंबीय रविवारी सायंकाळी गेले होते. त्यावेळी मुलांची बॅच असल्यामुळे त्यांचा मुलगा युग लाडवा (8) याला आत घेऊन त्याच्या वडीलांना बाहेर थांबण्यास सांगण्यात आले. ‘तुम्ही बाहेर जा आम्ही मुलाकडे लक्ष ठेवतो’ असे तेथील व्यवस्थापन पाहणार्‍या कर्मचार्‍यांनी सांगितले. मुलांची बॅच संपल्यानंतर आम्ही आत गेलो तेव्हा युग कुठेही दिसला नाही. त्यामुळे आम्ही त्याचा खूप शोध घेतला. तेथील कर्मचार्‍यांनाही विचारणा केली. त्यावेळी इथेच कुठेतरी खेळत असेल असे सांगून त्यांनी टाळाटाळ केली.

- Advertisement -

एके ठिकाणी तेथील काही कर्मचारी युगच्या छातीवर पंपींग करताना दिसून आले. त्यावेळी विचारणा केल्यावर तेव्हाही आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मात्र युग आम्हाला सोडून गेला होता. असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. मुलांची जबाबदारी आम्ही घेतो असे सांगून त्याचा तरण तलावाच्या व्यवस्थापनाने युगचा बळी घेतला आहे. पालिकेने हा तलाव बाली शर्मा नावाच्या ठेकेदाराला दिला आहे. त्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रशिक्षण, लाईफगार्ड तैनात केले नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एका बेजबाबदार ठेकेदारावर पालिकेने बेजबाबदारपणे जबाबदारी सोपल्याचे उघडकिस आले आहे.

या प्रकरणी तलावाचे व्यवस्थापक, सुरक्षा रक्षक, ठेकेदार आणि पालिकेच्या अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार रविंद्र फाटक यांनी केली आहे. या मागणीसाठी सोमवारी दुपारी जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, विनायक निकम, नविन दुबे, तालुकाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर,निलेश तेंडोलकर,जितेंद्र शिंदे,गटनेत्या किरण चेंदवणकर यांचे शिष्टमंडळ पालिका आयुक्त बळीराम पवार यांना भेटले.याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -