Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी एमएमआरडीए आयुक्त आर ए राजीव यांची ED मार्फत ८ तास चौकशी

एमएमआरडीए आयुक्त आर ए राजीव यांची ED मार्फत ८ तास चौकशी

Related Story

- Advertisement -

अंमलबजावणी संचलनालय (ईडी) मार्फत आज मंगळवारी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे आयुक्त आर ए राजीव यांची तब्बल ८ तासांहून अधिक चौकशी चालल्याची माहिती आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित टॉप्स सिक्युरीटीशी संबंधित पैशांची उधळपट्टी केल्यासाठीचा समन्स एमएमआरडीए आयुक्तांना पाठवण्यात आले होते. एमएमआरडीएने टॉप्स ग्रुप्सच्या एजन्सीला आणि इतर कंपन्यांना २०१४ ते २०१७ या कालावधीत तसेच २०१७ ते २०२० या कालावधीत कंत्राटे देण्यात आली होती. त्याप्रकरणातच ईडीने एमएमआरडीए आयुक्तांच्या नावे समन्स बजावला होता. टॉप्स सिक्युरीटीचे प्रमोटर आणि प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चंदोले यांना याआधीच आर्थिक गुन्हे शाखेमार्फत अटक करण्यात आली आहे. प्रताप सरनाईक आणि अमित चंदोले यांच्यात झालेल्या व्यवहाराबाबत ईडीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. (ED enquired metropolitan commissioner R A Rajeev more than eight hours)

ईडीने पाठवलेल्या समन्सनुसार गुरूवारी सकाळीच आर ए राजीव १२ वाजता हजर राहिले. आर ए राजीव यांनी स्वतः याठिकाणी हजर राहून स्वतः चौकशीदरम्यान उत्तरे दिली आहेत असे कळते. टॉप्स सिक्युरीटीला दिलेल्या कंत्राटाबाबतची माहिती यादरम्यान देण्यात आली. टॉप्स सिक्युरीटीने करारान्वये मान्य केलेल्या सुरक्षा रक्षकांपेक्षा कमी सुरक्षा रक्षकांची नेमणुक या कंत्राटादरम्यान करण्यात आली होती. त्यामुळेच या संपुर्ण प्रकणात संशयाची सुई निर्माण झाली होती. याआधीच प्रताप सरनाईक यांनी स्वतः हजर राहत ईडीच्या चौकशीदरम्यान उत्तरे दिली होती. आपण वेळोवेळी ईडीच्या चौकशीला हजर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यापाठोपाठच आता एमएमआरडीए अधिकाऱ्यांमध्ये आर ए राजीव यांचा जबाब ईडीने आज मंगळवारी नोंदवला आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -