घरमुंबईमोफत लसीकरणासाठी खासगी रुग्णालये, संस्थांनी पुढाकार घ्यावा - आदित्य ठाकरे

मोफत लसीकरणासाठी खासगी रुग्णालये, संस्थांनी पुढाकार घ्यावा – आदित्य ठाकरे

Subscribe

आरे कॉलनीतील आदिवासी पाड्यात पालिकेची लसीकरण मोहीम सुरू

खासगी रुग्णालये व संस्था यांनी मोफत लसीकरणात पुढाकार घेऊन लसीकरण मोहीम अधिक बळकट करावी, असे आवाहन पर्यावरण, पर्यटन व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. मुंबईतील गोरेगाव (पूर्व), आरे कॉलनी येथील वन परिसरात असणाऱ्या खांबाचा पाडा या आदिवासी पाड्यासह वरळी कोळीवाडा नजीकचे आदर्श नगर आणि शीव परिसरातील प्रतिक्षा नगर अशा ३ ठिकाणी लसीकरण केंद्रांचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. खांबाचा पाडा येथील लसीकरण केंद्र मुंबई महापालिकेच्या वतीने तर आदर्श नगर आणि प्रतिक्षा नगर येथील लसीकरण केंद्र मुंबई महापालिका व रिलायन्स फाऊडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरु करण्यात आले आहे.

लसीकरण होईपर्यंत कोणीही सुरक्षित नाही

लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी खासगी संस्था व रुग्णालये यांनी स्वतःहून घ्यायला पाहिजे. तरच लसीकरणाचा वेग वाढेल. त्यामुळे अधिकाधिक लोकांचे लसीकरण करणे शक्य होईल. सद्यस्थितीत महाराष्ट्रात तब्बल १ कोटी नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचा टप्पा देशभरातील राज्यातून सर्वप्रथम महाराष्ट्राने गाठला आहे. त्यासोबतच इतर राज्यांनीही लसीकरण झपाट्याने पूर्ण करणे गरजेचे आहे. जोपर्यत सगळ्यांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. इतर देशांची उदाहरणे बघितले असता लशीच्या २ मात्रा घेतल्यानंतरही मास्क लावणे आवश्यक आहे. कारण कोरोना अजूनपर्यंत पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे कोविड प्रतिबंधासाठी मास्क योग्यप्रकारे लावणे, साबणाने हात वारंवार स्वच्छ धुणे आणि एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे या बाबी सर्वांनी आपापल्या स्तरावर काटेकोरपणे पाळाव्यात, असे आवाहनही ठाकरे यांनी याप्रसंगी केले.

- Advertisement -

याप्रसंगी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू, आमदार रमेश लटके, आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, प्रभाग समिती अध्यक्ष रामदास कांबळे, माजी मंत्री सचिन अहिर, नगरसेवक मंगेश सातमकर, नगरसेविका हेमांगी वरळीकर व नगरसेविका रेखाताई रामवंशी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, कार्यकारी आरोग्य अधिकारी (प्रभारी) मंगला गोमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर तिन्ही लसीकरण केंद्रांद्वारे सुमारे दीड लाख नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. खांबाचा पाडा लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळासह लस साठ्याची संपूर्ण व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. तर, आदर्श नगर आणि प्रतिक्षा नगर येथील लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी आवश्यक ती डॉक्टर मंडळी, परिचारिका, कर्मचारी आणि कोव्हॅक्सिन लशीच्या मात्रा इत्यादी व्यवस्था रिलायन्स फाऊंडेशन द्वारे मोफत पुरविण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -