पहा व्हिडिओ : स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचा मालक मुंबई क्राईम ब्रॅंचसमोर हजर

mansukh hiren 1

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कारचा मूळ मालक आता समोर आला आहे. आपल्या कारबाबतच्या माहिती कबुली जबाब या व्यक्तीने मुंबई पोलिसांना दिला आहे. तसेच या कारबाबत काही महत्वाची माहितीही मुंबई पोलिसांना दिलेली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारमुळे एकच खळबळ गुरूवारी उडाली होती. या कारची मालकी कोणाची याचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. कारण मुकेश अंबानी यांच्या ताफ्यातील कारच्या क्रमांकाचा दुरूपयोग झाल्याचे प्रथमदर्शनी आढळले होते. त्यामुळेच मुंबई पोलिसांनी या कारच्या मालकाचा कसून तपास सुरू केला होता. मनसुख हिरेन हे ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यवसायिक असून ठाण्यातील रहिवासी आहेत. आपल्या गाडीचे स्टेअरींग खराब झाल्याने मी माझी गाडी विक्रोळीला पार्क केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

स्कॉर्पिओ गाडीचा मालक मनसुखे हिरेन मुंबई पोलिसांसमोर हजर

अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक मनसुखे हिरेन मुंबई पोलिसांसमोर हजर

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, February 26, 2021

 

या स्कॉर्पिओ गाडीचा मालक असलेला मनसुख हिरेन या व्यक्तीने आज शुक्रवारी मुंबई क्राईम ब्रांचकडे या संपुर्ण घटनेची माहिती दिली आहे. मनसुख हिरेन यांनी मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययु कार्यालयात सचिन वाझे यांच्याकडे याबाबतचा जबाब दिला आहे. माझी गाडी १७ तारखेला खराब झाल्याने मी ती गाडी विक्रोळी येथे पार्क करून निघालो. त्यानंतर गाडी हरवल्यासाठीची तक्रार मी मुंबई पोलिस ठाण्यात दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मुंबई पोलिसांनीही प्रसिद्ध केलेल्या अधिकृत माहितीमध्ये स्पष्ट केले आहे की, काही दिवसांपूर्वीच ही कार चोरी केल्याची माहिती आहे. या कारचा चेसीचा क्रमांक डॅमेज करण्यात आला आहे. पण पोलिसांनी या कारची मूळ ओळख तसेच मूळ मालक शोधला असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले होते.

या कारचे सीसीटीव्ही फुटेजही मुंबई पोलिसांना सापडले आहे. मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणाहून या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुजेट जमवले आहे. या कारमध्ये दिसलेल्या व्यक्तीची ओळख ही चेहऱ्यावर मास्क असल्याने पटवता आली नाही. पण पोलिसांचे टेक्निकल आणि फॉरेन्सिक विश्लेषण सुरू आहे. त्यामुळे या कारशी संबंधित आणखी माहिती लवकरच समोर येणार आहे. मुंबई पोलिसांनी स्पष्ट केल्यानुसार मुकेश अंबानी यांना याआधी कोणत्याच प्रकारे धमकीचे कॉल्स किंवा धमकीचे पत्र आले नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मुंबई ज्या ज्या ठिकाणी ही कार पार्क झाली त्याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांनी मिळवले आहे. या कारसोबतच एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारदेखील याठिकाणी आढळली. मुंबई पोलिस या कारचाही तपास करत आहेत. स्कॉर्पिओत आढळलेल्या जिलेटीनच्या कांड्या या कर्मशिअल म्हणजे बांधकाम क्षेत्रातल्या कामासाठी वापरण्यात येतात असे उघड झाले आहे. सध्या या तपासात कोणतीही प्रतिक्रिया देणे हे घाईचे ठरेल असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.