घरमुंबईवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ

Subscribe

सीईटी सेलकडून १७ जानेवारीपर्यंत वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस यासह १० वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेसाठी सीईटी सेलकडून मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना १७ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या नोंदणी अर्जाची प्रक्रिया १० जानेवारीपर्यंत करण्यात येणार होती. मात्र आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास विलंब होत असल्याने आणि राज्यात लागू केलेल्या निर्बंधामुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. सीईटी सेलच्या माहितीनुसार, प्राथमिक नोंदणी प्रक्रिया केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६१ हजार ४८१ इतकी आहे. गतवर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी ६४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता सीईटी सेलकडून १७ जानेवारीपर्यंत वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच या कालावधीत विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्याची संधी देण्यात आली आहे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक उमेदवारांच्या माहितीकरिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर NEET-UG येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक संधी मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -