घरमुंबईगणेशोत्सवात FDA ला सापडला १२ किलो भेसळयु्क्त खवा

गणेशोत्सवात FDA ला सापडला १२ किलो भेसळयु्क्त खवा

Subscribe

'एफडीए' म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करत एकूण १२ किलो खवा जप्त केला. एफडीएने मुंबईतील अनेक ठिकाणी धाड टाकत ही कारवाई केली.

मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी गणेशोत्सवादरम्यान पोलीस आणि पालिका प्रशासन सज्ज होतं. यासोबतच गणेशोत्सवादरम्यान बनवल्या जाणाऱ्या गोड पदार्थांवरही नजर ठेवण्यात आली होती. कारण गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात गोड पदार्थ खाल्ले जात असल्यामुळे भेसळ होण्याचं प्रमाणही अधिक असतं. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाचं यावर विशेष लक्ष होतं. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात ‘एफडीए’ म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करत एकूण १२ किलो खवा जप्त केला. एफडीएने मुंबईतील अनेक ठिकाणी धाड टाकत ही कारवाई केली. या खव्याची एकूण किंमत ५ हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. याशिवाय मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणांहून खव्याचे एकूण ४३ नमुने जमा करण्यात आले.

दोन ठिकाणी मोठी कारवाई

एफडीएने मुंबईतील कांदिवली पश्चिम इथल्या मुरली स्वीट शॉप आणि गुप्ता मिल्क सेंटर या दोन विक्रेत्यांकडून ५ हजार किंमतीचा खवा जप्त करुन नष्ट केला. १२ सप्टेंबर म्हणजेच गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी एफडीएने जुहूच्या गुप्ता मिल्क सेंटरमधून ८ किलोंचा खवा जप्त करुन तो नष्ट केला. ज्याची किंमत २ हजार ८८० रुपये इतकी होती. तर, १७ सप्टेंबर रोजी कांदिवलीच्या मुरली स्वीट शॉपमधून साडेचार किलो खवा जप्त करुन तो नष्ट केला. याशिवाय साडे सहा किलोचा बॉम्बे हलवाही जप्त करण्यात आला, ज्याची किंमत २ हजार २९० रुपये इतकी होती. अस्वच्छता असलेल्या परिसरात उत्पादन आणि साठवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई केली गेली. आतापर्यंत मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणांहून खव्याचे एकूण ४३ नमुने जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती एफडीएचे सहाय्यक आयुक्त अन्न बी.द. मुळे यांनी ‘माय महानगर‘ला दिली.

- Advertisement -

 वेगवेगळ्या ठिकाणांहून जमा केलेले खव्याचे हे ४३ नमुने सध्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी आहेत. दोन ठिकाणांहून खवा आणि बॉम्बे हलवा जप्त करण्यात आला, ज्याची किंमत जवळपास ५ हजारांहून अधिक आहे. अस्वच्छ परिसरात साठवणूक आणि उत्पादन केल्यामुळे हा खवा जप्त करुन जागीच नष्ट करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम आणि अनन्या रेगे यांनी ही कारवाई केली आहे. – डॉ. बी. द. मुळे , सहाय्यक आयुक्त, अन्न, एफडीए

४ महिन्यात १०० लीटर दूध जप्त

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दुधात भेसळ करणारं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. एप्रिल ते जुलै २०१८ या चार महिन्यांच्या काळात जवळपास १०० लीटर भेसळयुक्त दूध जप्त करुन नष्ट करण्यात आलं आहे. शिवाय, संबंधित विक्रेत्यांवर कारवाई देखील करण्यात आली. एफडीएकडून एक विशेष मोहिम राबवून करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये दूध भेसळ करणाऱ्यांना अटक करण्यात आली. चार महिन्यांच्या कालावधीत मुंबईतील खार दांडा आणि खार पश्चिम येथील दूध विक्रेत्यांकडून दूध जप्त करुन ते नष्ट करण्यात आलं.

- Advertisement -

भेसळयुक्त दुधावरील एफडीएची कारवाई

१६ ते २२ जानेवारी – २ हजार ७१६ लीटर दूधसाठा जप्त
१ एप्रिल ते जुलै – १०० लीटर दूधसाठा जप्त
१२ सप्टेंबर – मालाड आणि गोरेगाव या दोन ठिकाणाहून ३१० लीटर दुधाचा साठा जप्त
१८ सप्टेंबर – खारमध्ये २ ठिकाणी छापे, ३६३ लीटर दुधाचा साठा जप्त करुन नष्ट (किंमत १६ हजार ७८७ रुपये) या घटनेत ५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

एफडीएची कारवाई सतत सुरू असते. सणासुदीच्या दिवसांपर्यंत म्हणजेच डिसेंबरच्या अखेरपर्यंत अशाच कारवाई सुरू राहणार आहेत. दूधाच्या भेसळीत मोठ्याप्रमाणात पाणी मिसळलं जातं आणि नंतर ते विकलं जातं. त्यातून विक्रेते पैसे कमावतात. त्यामुळे भेसळयुक्त दुधावर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय, भेसळ करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. – शैलेश आढाव, एफडीएचे सह-आयुक्त (अन्न)

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -