घरमुंबईTandav Controversy: सैफ अली खानसह निर्मात्यांविरोधात मुंबईत FIR दाखल

Tandav Controversy: सैफ अली खानसह निर्मात्यांविरोधात मुंबईत FIR दाखल

Subscribe

वेबसिरीज निर्मात्यांनी माफी मागितल्यानंतरही हा वाद मिटल्याचे दिसत नाही

अली अब्बास जफर दिग्दर्शित आणि अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणारी तांडव ही वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली असून अद्याप हा वाद संपण्याचं नाव घेत नाही. दरम्यान तांडव वेबसिरीज निर्माते आणि वेबसिरीज मधील कलाकारांविरूद्ध मुंबईतील घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या वेबसिरीजच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. मात्र वेबसिरीज निर्मात्यांनी माफी मागितल्यानंतरही हा वाद मिटल्याचे दिसत नाही. या वेबसिरीजविरुध्द ६ शहरांमध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर आता यूपी पोलिसही निर्मात्यांच्या चौकशीसाठी मुंबई दाखल झाले आहेत.

- Advertisement -

सैफ अली खान व्यतिरिक्त झीशान अय्यूब, सुनील ग्रोवर, तिग्मांशू धुलिया हे मोठे स्टारही ‘तांडव’ वेबसिरीजमध्ये भूमिका साकारताना दिसताय. वादविवाद झालेल्या वेबसिरीजमध्ये अभिनेता मोहम्मद झीशान अय्यूब भगवान शिवाची भूमिका साकारताना दिसतोय. दरम्यान, या वेबसिरीजवर भगवान शिव आणि नारद मुनी यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. १५ जानेवारी रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणारी ‘तांडव’ वेब सीरिजवरून वाद निर्माण झाल्यानंतर निर्मात्यांनी लोकांच्या चिंता दूर करण्यासाठी बदल करण्याचे मान्य केले आहेत.

दिग्दर्शकाने मागितली माफी…

दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी असे म्हटले की, ही वेब सीरिज पूर्णपणे फिक्शन आहे. या सीरिजमधील घटनेचा कोणत्याही जिवंत व्यक्ती वा एखाद्या घटनेशी संबंध नाही. असलास तर तो योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्ती, जाती, समुदाय आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची माफी मागत आहोत.

- Advertisement -

भाजप नेते राम कदम यांनी घाटकोपरच्या चिराग नगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. तसेच राम कदम यांनी तिथे सरकारविरोधात नारेबाजीसुद्धा सुरू केली होती. त्यावेळी पोलिसांकडून राम कदम यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आता वेब सिरीज तांडवविरोधात घाटकोपर पोलिसांनी अंतर्गत सैफ अली खानसह Amazon आणि तांडवच्या टीमविरोधात FIR दाखल केलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -