घरमुंबईनेरूळच्या मॅरेडिअन टॉवरमध्ये आगीचा भडका

नेरूळच्या मॅरेडिअन टॉवरमध्ये आगीचा भडका

Subscribe

नवी मुंबईच्या नेरूळ सेक्टर या ६ भागात गुरुवारी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास अचानक आगीचा मोठा भडका उडाला. सेक्टर ६ परिसरातील पामबीच रोडवर असलेल्या मॅरेडिअन टॉवरच्या १४ मजल्यावर ही आग लागली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या ६ गाड्या त्याजागी पोहचल्या. काही काळ अथक प्रयत्न केल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आलं. समोर आलेल्या माहितीनुसार, या आगीमध्ये सुदैवाने कुणालाच कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र, १४ व्या मजल्यावरील ज्या फ्लॅटमध्ये ही आग लागली तेथील बरेचसे महत्वाचे सामान आणि कागदपत्रे जळून खाक झाली. अचानक लागलेल्या या आगीमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये काही काळ भितीचे वातावरण पसरले होते.

आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

आग लागल्याची माहिती फोनवरुन मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या मॅरेडिअन टॉवरच्या दिशेने रवाना झाल्या. त्यापैकी दोनच गाड्या सुरुवातीला घटनास्थळी पोहचल्या. मात्र, या दोन्ह गाड्यांमध्ये हायड्रोक्लिक शिडी (क्रेन) नसल्यामुळे आग विझवण्यासाठी १४ व्या मजल्यावर पोहचण्साठी जवानांना अडथळा निर्माण होत होता. मात्र, काही काळानंतर त्याठिकाणी पोहचलेल्या तिसऱ्या गाडीत क्रेन असल्यामुळे, अग्निशमन दलाचे जवान लगेचच काही उंचीवर पोहचले आणि टँकरच्या पाईपच्या साहाय्याने पाण्याचा फवारा केला. त्यानंतर काही वेळात आग आटोक्यात आली.

- Advertisement -

चीनी युवकांचे पासपोर्ट जळून खाक

हाती आलेल्या माहितीनुसार, मॅरेडियन टॉवरमधील १४ व्या मजल्यावरच्या ज्या फ्लॅटमध्ये ही आग लागली तो फ्लॅट २ चीनी तरूणांना भाडे तत्त्वावर देण्यात आला आहे. आग लागली त्यावेळी हे दोघंही आपल्या एका मित्राकडे जेवायला गेले अल्याने सुदैवाने त्यांचा जीव वाचला. मात्र, या आगीत त्यांच्या कागदपत्रांचे आणि घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोन्ही चीनी तरूणांचे पासपोर्ट, व्हिसा आणि अन्य काही महत्वाची डॉक्युमेंट्स या आगीमध्ये पूर्णत: जळून खाक झाली. दरम्यान, तपास अधिकारी ही आग नेमकी कशी लागली याचा शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे. गॅसच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -