घरमुंबईअंधेरीत गॅस सिलेंडरचा स्फोट; एक जण जखमी

अंधेरीत गॅस सिलेंडरचा स्फोट; एक जण जखमी

Subscribe

मुंबईतील अंधेरीत रविवारी दुपारी एका इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली.

मुंबईतील अंधेरीत आज, रविवारी दुपारी एका इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. अंधेरीतील यारी रोज परिसरात असेल्या माजिल मस्जिद चौकातील सरिता या चार मजली इमारतीत ही घटना घडली. सिलेंडरच्या स्फोटाचा धमाका झाल्याने परिसरातील नागरीक भयभीत झाले. त्यानंतर आगीचे लोळ उठू लागले. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही तासांनी आग विझवण्यात यश आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -