घरमुंबईMumbai Metro : मुंबई महापालिकेकडून मेट्रोच्या कंत्राटदारांना नोटीस, काय आहे प्रकरण?

Mumbai Metro : मुंबई महापालिकेकडून मेट्रोच्या कंत्राटदारांना नोटीस, काय आहे प्रकरण?

Subscribe

मुंबई मेट्रो रेल्वेशी संबंधित कामकाज करणाऱ्या पाच कंत्राटदारांनी तब्बल 326 कोटी रुपयांचा मालमत्ता करभरणा न केल्यामुळे मुंबई महापालिकेकडून त्यांना सात दिवसांची अंतिम नोटीस देण्यात आली आहे.

मुंबई : मुंबई मेट्रो रेल्वेशी संबंधित कामकाज करणाऱ्या पाच कंत्राटदारांनी तब्बल 326 कोटी रुपयांचा मालमत्ता करभरणा न केल्यामुळे मुंबई महापालिकेकडून त्यांना सात दिवसांची अंतिम नोटीस देण्यात आली आहे. या कंत्राटदारांना महापालिकेने मार्च 2024 मध्ये नोटीस जारी करत 21 दिवसांच्या आत करभरणा करण्यास यापूर्वी कळवले होते. मात्र तरीही सदर कालावधीत कंत्राटदारांनी करभरणा न केल्यामुळे आता सात दिवसांची अंतिम नोटीस जारी करण्यात आली आहे. या सात दिवसांच्या कालावधीत कंत्राटदारांनी करभरणा न केल्यास त्यांच्यावर मालमत्तेची अटकावणी आणि जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. (Mumbai Metro contractors Notice from Mumbai Municipal Corporation)

मुंबईत मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमआरसीएल) वतीने मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कामे सुरू आहेत. यासाठी एमएमआरसीलकडून मेसर्स सीईसी-आयटीडी, मेसर्स एल अँड टी स्टेक जेव्ही, मेसर्स डोगस सोमा, मेसर्स एचसीसी-एमएमएस-1, मेसर्स एचसीसी-एमएमएस-2 या कंत्राटदार कंपन्यांना मेट्रोचे काम करण्यासाठी वडाळा ट्रक तळ, भूकर क्रमांक 8 टप्पा 2 आणि 3 याठिकाणी कास्टिंग यार्डसाठी भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Mumbai School : मुंबईतील शाळांमध्ये आरटीईअंतर्गत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

एमएमआरसीएल आणि संबंधित कंत्राटदारांमध्ये झालेल्या करारानुसार, या भूखंडाच्या वापरासंबंधीचे मालमत्ता कर भरण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे. या पाचही कंत्राटदारांकडे मिळून 326 कोटी 22 लाख 69 हजार 846 रुपयांचा मालमत्ता कर थकित आहे. महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याकडून वारंवार सूचना देऊनही यापैकी चार कंत्राटदारांनी आर्थिक वर्ष 2016-17 पासून अद्यापर्यंत करभरणा केलेला नाही. तर, एचसीसी-एमएमसी या कंत्राटदाराकडे आर्थिक वर्ष 2010-11 पासून मालमत्ता कर थकीत आहे.

- Advertisement -

त्यामुळे, मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने मुंबई महापालिका अधिनियम 1888 मधील कलम 203 नुसार, 16 मार्च 2024 रोजी संबंधित कंत्राटदारांना 21 दिवसांच्या आत करभरणा करण्याची नोटीस जारी करण्यात आली. ही 21 दिवसांची देय मुदत 15 एप्रिल 2024 रोजी संपुष्टात आली. या 21 दिवसांच्या कालावधीतही त्यांनी करभरणा न केल्याने आता महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मेसर्स सीईसी-आयटीडी, मेसर्स एल अँड टी स्टेक जेव्ही, मेसर्स डोगस सोमा यांना 15 एप्रिल 2024 रोजी तसेच मेसर्स एचसीसी-एमएमएस-1 आणि 2 यांना 16 एप्रिल 2024 रोजी सात दिवसांची अंतिम देय मुदत नोटीस जारी करण्यात आली आहे.

हेही वाचा… BMC : मुंबईत हिवताप, डेंग्यूला आळा घालण्यासाठी पालिकेची तयारी, आयुक्त गगराणींनी घेतली बैठक


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -