घरमुंबईमुंबई उपनगरातील मतदान यंत्रांचे रॅन्डमायझेशन!

मुंबई उपनगरातील मतदान यंत्रांचे रॅन्डमायझेशन!

Subscribe

हे सरमिसळीकरण नि:पक्षपणे व्हावे, यासाठी ते संगणकीय प्रणालीद्वारे (Computer Software) करण्यात आले आहे.

राज्यात विधानसभा निवडणूकांचे बिगूल वाजले आहे. त्यानुसार २१ ऑक्टोबर रोजी राज्यात निवडणुक पार पडत आहे. मतदान प्रक्रिया नि:पक्ष वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सर्वस्तरीय कार्यवाही सातत्याने करण्यात येत असते. याच कार्यवाहीचा भाग म्हणून मतदान प्रक्रियेत उपयोगात येणाऱ्या यंत्रांचे दोन वेळा सरमिसळीकरण (Randomization) केले जाते. यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान उपयोगात येणाऱ्या मतदान यंत्रांचे भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ‘प्रथम सरमिसळीकरण’ (First Randomization) नुकतेच करण्यात आले आहे. हे सरमिसळीकरण नि:पक्षपणे व्हावे, यासाठी ते संगणकीय प्रणालीद्वारे (Computer Software) करण्यात आले आहे.

म्हणून मतदान यंत्रांचे रॅन्डमायझेशन

‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९’ अंतर्गत बाबत २६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणारा ‘मुंबई उपनगर जिल्हा’ हा मतदार संघ, मतदान केंद्र, मतदार संख्या व उपलब्ध भौगोलिक क्षेत्र यांचा विचार करता हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यात एकूण ७२ लाख २६ हजार ८२६ एवढी मतदार संख्या असून मतदान प्रक्रिया सुयोग्यपणे संपन्न व्हावी, यासाठी जिल्ह्यात ७ हजार ३९७ मतदार केंद्रे असणार आहेत. २१ ऑक्टोबर रोजी २०१९ रोजी होणारी मतदान प्रक्रिया नि:पक्ष वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सर्वस्तरीय कार्यवाही सातत्याने करण्यात येत असते. याच कार्यवाहीचा भाग म्हणून मतदान प्रक्रियेत उपयोगात येणाऱ्या यंत्रांचे दोन वेळा सरमिसळीकरण केले जाते.

- Advertisement -

‘प्रथम सरमिसळीकरण’ संपन्न

यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान उपयोगात येणाऱ्या मतदान यंत्रांचे भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ‘प्रथम सरमिसळीकरण’ (First Randomization) नुकतेच करण्यात आले आहे. हे सरमिसळीकरण नि:पक्षपणे व्हावे, यासाठी ते संगणकीय प्रणालीद्वारे (Computer Software) करण्यात आले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात येत्या २१ ऑक्टोबर २०१९ रोजी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान उपयोगात आणल्या जाणाऱ्या मतदान यंत्रांचे संगणकीय पद्धतीने ‘प्रथम सरमिसळीकरण’ जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाले.

हेही वाचा – नाराज अबू आझमी यांना आघाडीत घेण्यात काँग्रेसला यश

अतिरिक्त यंत्रांची तजवीज

येत्या २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान ७ हजार ३९७ मतदान केंद्रं असणार असून या मतदान केंद्रांवर एकूण १३ हजार ९६८ बॅलेट युनिट, ९ हजार ६८१ कंट्रोल युनिट आणि १० हजार ३२१ व्हीव्हीपॅट यंत्रे उपयोगात आणली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघात जेवढ्या यंत्रांची आवश्यकता आहे, त्यापेक्षा सुमारे २० टक्के अतिरिक्त बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट आहेत. तर सुमारे ३० टक्के अतिरिक्त व्हीव्हीपॅट यंत्रांची तजवीत करण्यात आली आहे. जेणेकरून कोणत्याही यंत्रामध्ये काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास पर्यायी यंत्रांची व्यवस्था सहजपणे होऊ शकेल.

- Advertisement -

…तर एकापेक्षा अधिक ‘बॅलेट युनिट’ची व्यवस्था

वरील तपशिलानुसार संबंधित व्यवस्था करताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघात साधारणपणे १५ उमेदवार असतील, असे गृहीत धरून ही व्यवस्था करण्यात आली आहे. तथापि, काही विधानसभा मतदारसंघात १५ पेक्षा अधिक उमेदवार असल्यास त्यानुरूप एकापेक्षा अधिक ‘बॅलेट युनिट’ची व्यवस्था करण्यात येईल. अशा प्रसंगी अजून एक पूरक सरमिसळ (Supplementary Randomization) करण्यात येईल. मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान उपयोगात येणारी यंत्रे ही सशस्त्र सुरक्षादलाच्या व कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. तसेच सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २४ तास देखरेख देखील ठेवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -