घरCORONA UPDATE५० दिवसानंतर उद्या धावणार मुंबईतून पहिली विशेष रेल्वे ट्रेन

५० दिवसानंतर उद्या धावणार मुंबईतून पहिली विशेष रेल्वे ट्रेन

Subscribe

तब्बल ५० दिवसानंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी मुंबईतून उद्या पहिली रेल्वे गाडी धावणार आहे. मुंबई सेंट्रल वरून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी दिल्लीसाठी ही विशेष ट्रेन रवाना होणार आहे. या गाडीचे रेल्वे तिकीट बुकिंग सुरु होताच काही तासातच रेल्वे गाडी हाउसफुल झाली आहे.

भारतात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून देशभरातील रेल्वे प्रवासी सेवा २३ मार्चपासून पूर्णपणे बंद होती. भारतीय रेल्वे सेवा सुरळीत सुरु करण्यासाठी १२ मे पासून ३० विशेष रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या रेल्वे गाड्याची बुकिंगसुद्धा आता आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरु झाली आहे. दिल्लीहून मुंबई सेंट्रल, डिब्रूगड, अगरतला, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगलुरू, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, अहमदाबाद आणि जम्मू तवीला या दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. भारतीय रेल्वने काही प्रमुख निवडलेल्या मार्गावर या प्रवासी रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

त्यानुसार पहिल्या टप्यात दोन्ही दिशेकडे जाण्यासाठी ३० अशा एकुण १५ मेल-एक्सप्रेसच्या जोड्या मंगळवार पासून धावणार आहेत. त्यामुळे मंगळवारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातून सर्व सामान्य प्रवाशांसाठी पहिली रेल्वे गाडी धावणार आहे. ही राजधानी एक्स्प्रेसच्या वेळेवर अर्थात सायंकाळी ५ वाजता दिल्लीला रवाना होणार आहे. विशेषतः ही गाडी मुंबई सेंट्रल ते दिल्ली दररोज धावणार आहे. ज्या प्रमाणे श्रमिक ट्रेन चालवीत होते. त्याच प्रकारची सर्व सुरक्षा लक्षात घेऊन या गाड्या भारतीय रेल्वेकडून चालविण्यात येणार आहेत. विशेष रेल्वे गाड्यातून फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. प्रवाशांना प्रवासा दरम्यान मास्क घालणे आणि स्क्रीनिंग करणे बंधनकारक असेल. केवळ वैद्यकीयदृष्ट्या सुरक्षित असलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये जाण्याची परवानगी असणार आहे, अशी माहिती रेल्वेचा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रेल्वे गाड्या हाऊसफुल

मंगळवारी धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्याचे तिकिटांचे बुकिंग सोमवरी आयआरसीटीसीच्या संकेत स्थळांवर सुरु झाले आहे. हे तिकीट बुकिंग सायंकाळी ६ वाजल्या पासून सुरु झाले होते. मात्र तासाभरात मुंबईतून सुटणारी रेल्वे गाडी हाऊसफूल झाल्याची माहिती आयआरसीटीसीच्या सूत्राने दिली. तसेच दिल्ली- मुंबई सेंट्रल धावणाऱ्या रेल्वे गाड्याचे १२ मे नंतरचा तारखेचे बुकिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

 

रेल्वेच्या गाइडलाईन्स पूर्णपणे पालन केल्या जाईल, तसेच प्रवाशांना आरोग्याची पूर्णपणे काळजी घेत, फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जाणार आहे. श्रमिक ट्रेन चालविण्यात येत आहेत. त्याप्रमाणे या देखील ट्रेन चालविण्यात येणार आहेत. – रविद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -