घरCORONA UPDATEआता चोरांना पकडणेही झाले धोक्याचे; पाच कोरोनाबाधित चोरांमुळे १७ पोलीस क्वारंटाईन

आता चोरांना पकडणेही झाले धोक्याचे; पाच कोरोनाबाधित चोरांमुळे १७ पोलीस क्वारंटाईन

Subscribe

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता पोलिसांसाठी चोरांना पडकणेदेखील धोक्याचे झाले आहे. कुर्ला परिसरात चोरी करताना पकडलेल्या पाच आरोपींना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांना पडकलेल्या १७ पोलिसांना आता क्वारंटाईन करण्यात आले आहे. नेहरू नगर पोलीस स्टेशनमधील हे १७ जण असून त्यापैकी तीन वरिष्ठ अधिकारी हे अटक प्रक्रियेत सहभागी होते, अशी माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात सात जणांनी चोरी केली होती. त्यापैकी पाच जणांना चेंबूर आणि सायन येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. बुधवार त्या आरोपींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दोन आरोपींचा चाचणी अहवाह अद्याप आलेला नाही, अशी माहिती मिळत आहे. त्या दोघांची जामिनावर सुटका होणार असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, त्यांच्या अटकेच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या १७ पोलिसांना आता क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव 

मुंबईमध्ये गुरुवारी १ हजार ५४० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ५३ हजार ९८५ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १ हजार ९५२ वर पोहोचला आहे. तसेच गुरुवारी ५१६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २७ हजार ८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तरीही मुंबईत अनलॉक १ मध्ये अनेक व्यावहारीक आणि वाहतुकीचे पर्याय खुले केल्यामुळे लोकांची गर्दी जागोजागी पहायला मिळत आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाल्याचेही दिसून येते.

- Advertisement -

हेही वाचा –

धनंजय मुंडेंना कोरोनाची लक्षणं नाहीत, श्वसनाच्या त्रासासाठी रुग्णालयात जाणार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -