घरताज्या घडामोडीरिपोर्ट निगेटिव्ह येताच डॉक्टरसह कर्मचाऱ्यांचा बँड लावून डान्स

रिपोर्ट निगेटिव्ह येताच डॉक्टरसह कर्मचाऱ्यांचा बँड लावून डान्स

Subscribe

रिपोर्ट निगेटिव्ह येताच डॉक्टरसह कर्मचाऱ्यांनी बँड लावून डान्स केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे.

देशात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय प्रशासन, पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. दरम्यान, आतापर्यंत देशात कोरोनामुळे ८ हजारांहून लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. मात्र, कोरोनाविषयीचे गांभीर्य लोकं विसरायला लागले असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

असे आले उघडकीस?

बीडमधील एका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरसह कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरच फटाके फोडून नाचत आनंदोत्सव साजरा केला. मात्र, हा जल्लोष त्यांना चांगलाच महागात पडला आहे. या कर्मचाऱ्यांनी हा व्हिडीओ बनवून तो प्रसारित केला गेला. मात्र, दुपारी डॉ. गजानन देशपांडेंसह डॉ. श्रेयश देशपांडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करत रस्त्यावर फटाके फोडले आणि डान्सही केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित डॉक्टर अनिरुद्ध यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

बीड जिल्ह्यातील आंबेवडगाव तालुक्यातील धारूर येथील कोरोनाग्रस्त एका रुग्णाने माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेतला होता. त्यामुळे डॉक्टरांसह सुमारे ५५ कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. तीन दिवस कर्मचाऱ्यांची धाकधूक होती. गुरुवारी दुपारी हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे माजलगावकरांना दिलासा मिळाला आहे.


हेही वाचा – पुण्यात कोरोनाचे २६८ नवे रुग्ण; बाधितांचा आकडा ८ हजार पार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -