घरमुंबईWorli Lift Crash: वरळी लिफ्ट दुर्घटनेत ५ मजुरांचा मृत्यू; दोन जणांविरूद्ध गुन्हा...

Worli Lift Crash: वरळी लिफ्ट दुर्घटनेत ५ मजुरांचा मृत्यू; दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल

Subscribe

वरळी लिफ्ट दुर्घटना प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कंत्राटदार आणि सुपरवायझर यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईतील वरळी लिफ्ट दुर्घटना प्रकरणी नारायण मल्हार जोशी मार्ग पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा बांधकाम साईट सुपरवायझर स्वप्नील म्हामुणकर आणि कंत्राटदार मुकेशभाई पारसिया यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.

अशी घडली घटना

वरळी येथील बीडीडी चाळ क्रमांक ११९ समोर असणाऱ्या ललित अंबिका विकासक यांच्याकडून बांधकाम करण्यात आलेली श्री. लक्ष्मी को-ऑप- हौसिंग सोसायटीच्या वाहन पार्किंग बांधकामाच्या येथील लिफ्ट शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास १७ व्या मजल्यावरून कोसळून दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत ५ मजुरांचा मृत्यु झाला होता, तर एक मजूर गंभीररीत्या जखमी झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी नारायण मल्हार जोशी मार्ग पोलीस ठाण्यात शनिवारी साईट सुपरवायझर आणि कंत्राटदार विरुद्ध मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, वरळीतील हनुमान गल्लीत बीडीडी चाळ नंबर ११८ आणि ११९ च्या समोर असलेल्या ललित अंबिका या निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी झालेल्या एकाने उपचारादरम्यान जीव गमावला. मृतांमध्ये अविनाश दास (३५ वर्षे), भारत मंडल (२७वर्षे), चिन्मय मंडल (३३ वर्षे) आणि एका ४५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. अटकेतील आरोपींनी कामगारांना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट यासारख्या सुविधा पुरवल्या नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शनिवारी संध्याकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत मदतकार्य केले होते. जखमींना तातडीने केईएम रुग्णालय आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -