घरताज्या घडामोडीकिल्ले दुर्गाडी आणि घंटा नाद आंदोलन शिवसेनेकडून रद्द

किल्ले दुर्गाडी आणि घंटा नाद आंदोलन शिवसेनेकडून रद्द

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा किल्ले दुर्गाडी आणि घंटा नाद आंदोलन शिवसेनेकडून रद्द करण्यात आले आहे.

बकरी ईदनिमित्त समस्त मुस्लिम बांधव किल्ले दुर्गाडी येथील इदगा येथे नमाज पडण्यासाठी काही वर्षांपासून येत आहेत. मात्र, त्याच वेळी किल्ले दुर्गाडी मंदिरातील घंटा वाजविण्यास पोलिसांकडून मज्जाव होऊ लागला होता. तसेच मंदिरातील भाविकांना यायला बंदी देखील करण्यात आली होती. हे समस्त हिंदू बांधवांसाठी अन्यायकारक होते. हा आपला हक्क हिरावून घेतला जातो ही बाब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला.

नेमके काय आहे किल्ले दुर्गाडी, घंटा नाद आंदोलन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सदर बाब स्व.आनंद दिघे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याबाबत आंदोलन छेडण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर स्व शिवसेनाप्रमुखांचा आदेश शिरसावंद्य मानून आनंद दिघे यांनी हे आंदोलन तीव्रपणे छेडले होते. शेकडो शिवसैनिक, रणरागिणी तसेच हिंदू मंच अनेक हिंदू संघटनेतील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होऊन घोषणा देत दुर्गाडीच्या पायथ्यापर्यंत घंटा नाद करीत हे आंदोलन वर्षानू वर्ष चालू ठेवले होते. स्व. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नंतर सदर आंदोलनाची धुरा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने तमाम शिवसैनिक, शिवसेनेच्या रणरागिणी आणि काही हिंदू धर्माभिमानी हिंदूंच्या सहकार्याने सातत्याने चालू ठेवली.

- Advertisement -

कोरोनामुळे करण्यात आले रद्द

परंतु, यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जग, देश राज्य संकटात आहे आणि महामारी टाळण्याचा मूल मंत्र गर्दी टाळणे हा असल्याने पालकमंत्री शिवसेना नेते यांच्या आदेशान्वये गर्दी टाळण्याचा दृष्टीने सदर आंदोलन या वर्षा करिता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


हेही वाचा – Corona: पोलीस दलातील जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -