घरमुंबईमुसळधार पाऊस, खड्डेमय रस्त्यांमुळे विसर्जनात अडचणी

मुसळधार पाऊस, खड्डेमय रस्त्यांमुळे विसर्जनात अडचणी

Subscribe

डोंबिवलीतील नावाजलेल्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नेत्रदिपक विसर्जन मिरवणूक पार पडली. पालखीत विराजमान श्रीं ची लोभसवाणी मूर्ती, त्यापुढे मावळ्यांच्या वेशभूषेत अब्दागिरी धरून उभे असलेले मंडळाचे दोन कार्यकर्ते, मृदुंगाच्या तालावर भक्तीत दंग होऊन भजन म्हणणारे भजनी मंडळ, ढोल-ताशाच्या नादावर शिस्तबद्धपणे लेझीम खेळणारे नगरवासी आणि मिरवणूकीची शान असणारे 24 महिलांचे लेझीम पथक तसेच 10 महिलांचे झांज पथक असे स्वरूप या मिरवणूकीचे होते.

गेली 69 वर्षे कार्यरत असणार्‍या टिळकनगर गणेशोत्सव मंडळाचा यंदा 70 वा गणेशोत्सव संपन्न झाला. अनेक क्षेत्रात आपल्या आयोजन कौशल्यामुळे आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे प्रसिद्ध असलेल्या मंडळाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक हा डोंबिवलीकरांसाठी एक मानबिंदू आहे. बदललेल्या विसर्जन मिरवणूकीच्या काळातही गुलाल विरहीत, फटाके अथवा डिजे यांचा वापर न करता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि आपल्या परंपरा जपत मिरवणूक साजरी करणारी फार कमी मंडळे अस्तित्वात आहेत.

- Advertisement -

मिरवणुकीत यंदा 11 व्या वर्षी मंडळाच्या कार्यकर्त्या चैत्राली भावे यांनी झांज आणि लेझीम पथकाचे प्रतिनिधीत्व केले. डोंबिवलीत राहणार्‍या 24 महिला या पथकात होत्या. यामध्ये विविध प्रकारच्या लेझीम प्रकारांचा समावेश तर 10 महिलांचा झांज प्रकाराचा समावेश होता. मात्र मिरवणुकीच्या रस्त्यांच्या झालेल्या खड्डेमय दयनीय अवस्थेबाबत अनेक नागरीकांनी प्रशासनाच्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाबद्दल खेद व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -