घरताज्या घडामोडीMaharashtra Budget Session 2022 : विधानसभेत गिरीश महाजन यांच्या डुलक्या

Maharashtra Budget Session 2022 : विधानसभेत गिरीश महाजन यांच्या डुलक्या

Subscribe

बीडमधील गुन्हेगारीच्या प्रश्नावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गांभीर्याने बोलत होते. त्यांच्या मागच्याच आसनावर गिरीश महाजन आणि आशीष शेलार बसले होते. फडणवीस यांचे भाषण सुरु असताना गिरीश महाजन चक्क डुलक्या देऊ लागले. शेलार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हाताच्या कोप-याने गिरीश महाजन यांना धक्का देऊन झोपेतून जागे केले.

विधानसभेत सोमवारी बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यस्थेवर गंभीर चर्चा सुरु असताना भाजपचेआमदार गिरीश महाजन चक्क डुलक्या देत होते. कामकाज सुरु असताना एकदा तर मोबाईलवर बोलण्यात गर्क असल्याने अखेर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी महाजनांना समज दिली.

बीडमधील गुन्हेगारीच्या प्रश्नावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गांभीर्याने बोलत होते. त्यांच्या मागच्याच आसनावर गिरीश महाजन आणि आशीष शेलार बसले होते. फडणवीस यांचे भाषण सुरु असताना गिरीश महाजन चक्क डुलक्या देऊ लागले. शेलार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हाताच्या कोप-याने गिरीश महाजन यांना धक्का देऊन झोपेतून जागे केले. गिरीश महाजन खडबडून जागे झाले. याचा व्हिडीओही सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

तत्पूर्वी सभागृहात चर्चा सुरु असताना गिरीश महाजन फिरत फिरत सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर येऊन बसले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश सोळंके यांनी आक्षेप घेतला. गिरीश महाजन सत्ताधारी पक्षात आले का? असा मिश्किल सवाल सोळंके यांनी केला तेव्हा तातडीने गिरीश महाजन उठले आणि विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसले.

सभागृहात चर्चा सुरु असताना गिरीश महाजन मोबाईलवर बोलण्यात गर्क होते. त्यावरही सोळंके यांनी आक्षेप घेतला. त्यांचा फोन जप्त करण्याची सूचना सत्ताधारी पक्षाच्या बाकावरून करण्यात आली. तरीही ते मोबाईवर बोलण्यात गर्क होते. अखेर नरहरी झिरवळ यांनी गिरीश महाजन यांना समज दिली. तेव्हा त्यांनी फोनवरचा संवाद त्वरीत थांबवला.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Budget Session 2022 : वाळू माफियांवर कारवाई केली तर तुम्ही फोन करू नका – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -