घरताज्या घडामोडीलोकलच्या गर्दीचा आणखी एक बळी; डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू

लोकलच्या गर्दीचा आणखी एक बळी; डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू

Subscribe

आज डोंबिवली-कोपर स्थानकादरम्यान लोकलमधील गर्दीमुळे रेल्वे रुळावर पडून तरुणीचा मृत्यू झाला आहे.

लोकलमधील गर्दीमुळे आणखी एका तरूणीला जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी डोंबिवली कोपरदरम्यान घडली आहे. चार्मी पासड वय २२ असे त्या तरूणीचं नाव आहे. अपुऱ्या लोकल आणि वाढत्या गर्दीमुळे लोकलमधून पडून जीव गमवावा लागल्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकलमधील गर्दीचे आणखी किती बळी घेणार? असा संतप्त सवाल प्रवाशांमध्ये उपस्थित होत आहे.

चार्मीच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात शोककळा

डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा भोपर परिसरातील नवनीतनगर कॉम्पलेक्समध्ये राहणारी २२ वर्षीय चार्मी पासद ही मुंबईत एका खाजगी कंपनीत कामाला होती. सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास डोंबिवली स्थानकातून लोकल पकडली. लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी जास्त असल्याने तिला डब्ब्यात शिरता आले नाही. त्यामुळे तिला दरवाजात लटकून प्रवास करावा लागल्याने तोल गेल्याने डोंबिवल-कोपर रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलममधून पडून चार्मीचा दुदैवी मृत्यू झाला. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी चार्मीला केडीएमसीच्या शात्रीनगर हॉस्पीटलमध्ये दाखल केले. मात्र त्याअगोदर तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. चार्मीच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तिला दोन भाऊ आणि आई असा परिवार आहे. चार्मी कंपनीत काम करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावत होती. त्यामुळे तिच्या मृत्यूने कुटूंबाचा आधारही हरपला आहे. चार्मी ही गर्दीची पहिली बळी नसून यापूर्वी सात प्रवाशांना अशा प्रकारे जीव गमाविण्याची वेळ आली आाहे. भावेश नकाते, धनश्री गोडवे, रजनीश सिंग, नितेंद्र यादव, सविता नाईक आणि शिववल्लभ गुजर यांचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

डोंबिवलीकरांचा प्रवास जीवघेणा ठरतोय

डोंबिवली रेल्वे स्थानकातून सकाळच्या वेळी लोकलमध्ये चढणे आणि उतरणे खूपच मुश्किल असते. प्रचंड गर्दीच्या रेट्यातून डोंबिवलीकरांना प्रवास करावा लागतो. आणि त्याच रेट्यातून धक्के खात घरी परतावे लागत आहे. लोकलमधील गर्दीमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. डोंबिवलीतील लोकलमधील गर्दी आता जीवघेणी ठरू लागली आहे. त्यामुळे लोकलमधील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ठोस उपायोजना कधी करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातून डोंबिवली फास्ट लोकल सुरु केली पाहिजे. गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने ठोस उपाययोजना केली पाहिजे. लोकलमधून बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र रेल्वे प्रशासन कोणतीच भूमिका घेताना दिसत नाही. रेल्वेने तातडीने पावले उचलली पाहिजेत.
जयंतीलाल गड्डा, स्थानिक नागरिक

- Advertisement -

वाढत्या गर्दीमुळे लोकलमध्ये चढणे आणि उतरणे मुश्किल असते. मुंबईकडे नोकरीला जाणाऱ्यांना दररोजचा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधी ढिम्म आहेत. त्यांचे डोळे कधी उघडणार? आणखी किती बळी घेणार आहेत?
रजनी व्होरा, रेल्वे प्रवासी

आतापर्यंतचे बळी

भावेश नकाते
धनश्री गोडवे
नितेंद्र विरेंद्र यादव
रविकांत चाळकर
सविता नाईक वय
शिववल्लभ गुजर
जयेश विठ्ठल कुडव
संतोष किर्ती कोहली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -