घरमनोरंजन'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाचे नाव तात्काळ बदला, काँग्रेस आमदार अमीन पटेल यांची मागणी

‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाचे नाव तात्काळ बदला, काँग्रेस आमदार अमीन पटेल यांची मागणी

Subscribe

बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भंन्साळीचे सिनेमे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतात.

बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भंन्साळीचे सिनेमे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतात. यातच त्यांचा आगामी बहुचर्चित ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाला विरोध होताना दिसत आहे. कामाठीपुऱ्यातील नागरिकांनी या चित्रपटातून कामाठीपुराची बदनामी केली जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी या चित्रपटाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या वादात आता काँग्रेसच्या आमदारानेही उडी घेतली आहे. दक्षिण मुंबईचे काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी चक्क विधानसभेत या चित्रपटाविरोधात आवाज उठवला आहे. आमदार अमीन पटेल यांनी चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेत नाव बदलण्याची मागणी केली आहे. अमीन पटेल यांनी या चित्रपटाविरोधात विधानसभेत आवाज उठवत सांगितले की, कामाठीपुरा शहर १९५० रोजी ज्याप्रकारे होते तसे राहिले नाही. याठिकाणच्या महिलांनी अनेक क्षेत्रात आपले नाव उंचावले आहे. त्यामुळे ‘गंगूबाई काठियावाडी’नावामुळे काठियावाड शहराचे नाव बदनाम होत असल्याने या चित्रपटाचे नाव लगेचच बदलले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

या चित्रपटाचा नावाचा वाद थेट विधिमंडळापर्यंत पोहचल्याने संजय लीला भंसाळी आता यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. संजय लीला भंसाळीच्या या सिनेमात कामाठीपुऱ्यातील महिला डॉन गंगूबाई काठियावाडीची कथा मांडली आहे. ही कथा 60 च्या दशकातील सत्य घटनेवर आधारित आहे. प्रसिद्ध लेखक हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वींस ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. ३० जुलै २०२१ रोजी हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होता आहे. परंतु प्रदर्शानपूर्वीच चित्रपट वादात अडकला आहे. या वादाबरोबरच भंन्साळींसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे ते म्हणजे संजय भंन्साळी आणि या चित्रपटातील अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे शुटिंगही थांबवण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा- दिग्दर्शक संजय लिला भन्साळींना कोरोनाची लागण

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -