घरमुंबईऔषधांची अवैध दरवाढ रुग्णांच्या माथी; कंपन्यांचा कारभार!

औषधांची अवैध दरवाढ रुग्णांच्या माथी; कंपन्यांचा कारभार!

Subscribe

ग्लॅक्सो आणि सन फार्मा या कंपन्यांनी थेट प्रचलित औषधांचे दर वाढवून रुग्णांच्या माथी मारले आहेत. कंपनीही त्यावर चकार शब्द काढत नाही.

औषध दर नियंत्रण आदेश (DPCO – Drug Price Control Order ) या सरकारी विभागाच्या परवानगीशिवाय औषधांच्या किंमती ठरत नाहीत. मात्र, या आदेशाचे पालन सध्या औषधे तयार करणाऱ्या कंपन्या करत नसल्याचे समोर आले असून याबाबतची तक्रारच ऑल फूड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशन या संघटनेकडून करण्यात आली आहे. एका नामांकित औषध कंपनीने औषध दर नियंत्रण आदेश विभागालाच आव्हान दिले असल्याचे प्रकरण ऑल फूड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले आहे.

परवानगी न घेताच दरांमध्ये बदल

अभय पांडे यांच्या म्हणण्यानुसार ग्लॅक्सो आणि सन फार्मा या कंपन्यांनी थेट प्रचलित औषधांचे दर वाढवून रुग्णांच्या माथी मारले आहेत. कंपनीही त्यावर चकार शब्द काढत नाही. औषधांच्या किंमती सरकारचा औषधे मूल्य नियंत्रण आदेश विभाग ठरवत असतो. तर, औषध दर नियंत्रण प्राधिकारण औषधांच्या दराबाबतचा बाजारातील पाठपुरावा करत असते. एका खासगी औषध कंपनीने औषध निर्मिती करुन दर नियंत्रण विभागची (DPCA – Drug Price Control Authority) परवानगीच घेतलेली नाही.

औषधांची किंमत संबंधित सरकारी विभागांशी चर्चा न करता कशी वाढवली याची चौकशी करण्यात यावी. आतापर्यंत या कंपनीने औषधांच्या अधिकच्या किंमतीतून अवैधरित्या कमावलेला पैसा जनतेच्या हितासाठी खर्च व्हावा. तसेच, या औषधांवर सरकारी विभागांचे नियंत्रण असावे.

अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशन

- Advertisement -

औषध विक्रीत करोडोंची उलाढाल

सदर कंपनीने औषधांच्या किंमती अवैधरित्या वाढवलेल्या असून शेकडो करोडो रुपयांची उलाढाल या औषध विक्रीतून होत आहे. सरकारी विभागाच्या डोळ्यात धूळ फेकून औषध विक्री सुरु आहे. यातून रुग्णांची लूट होत असल्याचा प्रकार पांडे यांनी सांगितला. त्यासाठी संघटनेकडून मागणी करण्यात येत आहे. तसा पत्र व्यवहार संबंधित सरकारी विभागांशी केला असल्याचेही पांडे यांनी सांगितले.


हेही वाचा – सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांची कमतरता – मार्डची तक्रार

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -