घरमुंबईगोकुळ दूध दोन रुपयांनी स्वस्त

गोकुळ दूध दोन रुपयांनी स्वस्त

Subscribe

गोकुळ दूध ग्राहकांना उद्यापासून दिलासा मिळणार आहे. दोन रुपयांनी गोकुळ दूध स्वस्त झाल्याने भरमसाट महागाईनंतर नागरिकांना हायसे वाटले आहे.

महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला गोकुळ दूध उत्पादक संघाने दिलासा दिला आहे. गोकुळने दुधाचे दर प्रति लिटर दोन रुपयांनी कमी केले आहेत. यामुळे महागाईपासून थोडासा का होईना दिलासा मिळणार आहे. उद्यापासून गोकुळ दुधाचे  दर दोन रुपयांनी कमी झाल्याने ग्राहकांना हायसं वाटत आहे. गेल्या महिन्याभरात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होत आहे. तर अनुदानित सिलिंडरच्या दरात अडीच रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याचदरम्यान पाण्याच्या दरात देखील भरमसाठ वाढ करण्यात आली होती. 

नवीन दराची उद्यापासून होणार अंमलबजावणी

गोकुळ दूध उद्यापासून स्वस्त होणार असल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. २१ जूनपासून या नवीन दराची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर एबीपी माझाच्या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार गोकुळ दुधाचा आधीचा दर २८.५० रुपये होता. मात्र, आता हे गोकुळ दूध उद्यापासून २६.५० रुपयांना मिळणार आहे.

- Advertisement -

तोट्यामुळे केली होती दरवाढ

गेल्या वर्षी जुलै महिन्यात गोकुळचे दर वाढवण्यात आले होते. दोन रुपयांनी दर वाढ करण्यात आली होती. अडचणीत सापडलेल्या दुध उत्पादकाला सावरण्यासाठी ही दर वाढ करण्यात आली होती. तसेच संघाचा तोटा देखील होत होता. यासर्व गोष्टींचा विचार करुन दोन रुपयाने दर वाढ केली होती.

मात्र, आता गोकुळच्या दूधात कपात

गोकुळकडून दररोज तब्बल साडेचार लाख लिटर दूध संकलित केले जाते. पण ज्याप्रमाणात दूध संकलित केले जाते त्याप्रमाणात विक्री होत नाही. त्याचबरोबर संघाचा देखील मोठ्या प्रमाणात तोटा होत असल्यामुळे या दुधाच्या दरात कपात करण्यात आली असून उद्यापासून दुधाचे दर कमी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -