घरमुंबईसरकारचा सुविधांवर नाही तर मेस्मा लावण्यावर भर - डॉक्टरांचा आरोप

सरकारचा सुविधांवर नाही तर मेस्मा लावण्यावर भर – डॉक्टरांचा आरोप

Subscribe

राज्य सरकारच्या सर्वात मोठ्या जे. जे. रुग्णालयामध्ये सुविधा आणि तपासण्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. मात्र त्याकडे सरकार दुर्लक्ष करीत असून मेस्मा हा कायदा लावण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे.

राज्य सरकारच्या सर्वात मोठ्या जे. जे रुग्णालयामध्ये मूळ सुविधा किंवा तपासण्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. मात्र त्याकडे सरकारचे लक्ष नसून मेस्मा हा कायदा लावण्याभर भर देत असल्याचा आरोप डॉक्टरांनी दिला आहे. त्यासोबतच, रुग्णालयात सीबीसी म्हणजेच ‘कंम्प्लिट ब्लड काऊंट’ ही सुविधा उपलब्ध नाही आहे, असा देखील आरोप ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स’ (मार्ड) या संघटनेने केला आहे. राज्य सरकारच्या निवासी डॉक्टर, कर्मचारी आणि परिचारिका संपावर गेल्यास ‘महाराष्ट्र एसेंशियल सर्विस मेंटनंस अॅक्ट’ म्हणजेच मेस्मा लावण्यात येईल, असा निर्णय देण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटनेने शनिवारी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

रुग्णालयात ही औषध उपलब्ध नाहीत

रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी यावेळी सांगितलं की, सीबीसी , सिरम एलेक्ट्रोलाइट्स या तपासण्यांसोबत, मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना लागणाऱ्या लिथियम आणि हैलोपॅरिडॉल सारखी औषधं ही रुग्णालयात उपलब्ध नाही आहेत.

- Advertisement -

मेस्मा लावण्याचा हा निर्णय एकतर्फी आहे. निवासी डॉक्टरांचा आवाज दडपण्यासाठी सरकार डॉक्टरांवर मेस्मा लावण्याचा निर्णय घेत आहे. कुठल्याच गोष्टीविरोधात आम्ही आवाज उठवू नये, यासाठी हा मेस्मा लावला जात आहे. राज्य सरकारच्या रुग्णालयात कुठल्याही प्रकारच्या तापासाठी केल्या जाणाऱ्या तपासण्यांची ही सुविधा उपलब्ध होत नाही. याचा परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होतो आणि त्याचा रोष डॉक्टरांना भोगावा लागतो. त्यातून डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रकार घडतात. त्यातूनच डॉक्टर संपावर जाण्याचा निर्णय घेतात. सरकार आवश्यक औषधं आणि मूळ सुविधांवर लक्ष देण्याच्या ऐवजी २४ तास काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांवर चुकीचा कायदा लागू करण्याच्या भूमिकेत आहे.

तसेच काही महिन्यांपूर्वी जे.जे. रुग्णालयात डॉक्टरांवर हल्ला झाला होता. तेव्हा सरकारकडून सुरक्षा देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. यात अलार्म सिस्टिम पासून सुरक्षारक्षकांची संख्या वाढवणं या मागण्या होत्या. पण, पुन्हा यावर काहीच चर्चा झाली नाही. याविषयी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांची भेट घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, अजूनही आम्हाला वेळ दिली गेलेली नाही. सरकारने आमची समस्या जाणून न घेता, आम्हाला नं सांगता आमच्या मेस्मा लावण्याचा निर्णय घेतला आहे. याचा आम्ही विरोध करत आहोत.  – डॉ. लोकेश चिरवटकर, सेंट्रल मार्ड संघटनेचे अध्यक्ष

- Advertisement -

रुग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. सर्व तपासण्या होत आहेत. मार्डकडून लोकांना खोटं सांगितलं जात आहे. याविषयी आम्ही मार्डसोबत चर्चा करणार आहोत.  – डॉ.मुकुंद तायडे, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता

वाचा – डॉक्टरांवर मेस्मा लावणे चुकीचे; मध्यवर्ती मार्डचा निर्णयावर आक्षेप!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -