घरमुंबईकामगार रुग्णालयातील मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत

कामगार रुग्णालयातील मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत

Subscribe

अंधेरीमधील मरोळ येथे असलेल्या कामगार रुग्णालयात मृत झालेल्या व्यक्तींना १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी जाहीर केली आहे.

सोमवारी अंधेरी एमआयडीसी कामगार रुग्णालयाला आग लागली. या आगीत एका दोन महिन्याच्या चिमुकलीसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून १५७ जण जखमी झाले. केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवाल यांनी मृत्यू पावलेल्या पीडित कुटुंबियांना १० लाख रुपयांची तर गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. येथील कामगार रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. प्राथमिक अहवालानुसार नव्या इमारतीच्या तळ मजल्यावरील गोदामातील भंगार साहित्याने पेट घेतला. त्यामुळे शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली.

अजूनही १४१ जखमींवर उपचार सुरू

तळमजल्यावर लागलेल्या या आगीचा धूर चौथ्या मजल्यापर्यंत पसरत गेला. ही इमारत सगळ्या बाजूने काचांनी बंद असल्यामुळे धूर बाहेर पडण्यास जागा नव्हती. धुरामुळे आत अडकलेले रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक तसेच कर्मचारी यांना गुदरमरल्यासारखे होऊन श्वासोच्छवास घेण्यास त्रास झाल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. या घटनेत एकूण १७७ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या रुग्णालयात १६९ उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २८ रुग्णांना घरी पाठवण्यात आले असून १४१ जण आता उपचार घेत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

- Advertisement -

प्रकरणाची होणार चौकशी

दरम्यान, या आगीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली. दुर्घटनेनंतर केंद्रीय कामगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी सोमवारी कामगार आणि एसआयएस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. आग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शक्य होईल तितकी मदत करण्याचे आदेश गंगवार यांनी या बैठकीत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली. दुर्घटनेतील पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन देतानाच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.


वाचा – रबराने केला घात; आग कमी, धूर जास्त

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -