घरमुंबईमुंबई विद्यापीठात पार पडणार दीड लाख विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ

मुंबई विद्यापीठात पार पडणार दीड लाख विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ

Subscribe

यामध्ये ९० हजार ३९३ विद्यार्थिनी तर ७७ हजार ८४६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पदवीसाठी १ लाख ३९ हजार ८३ तर पदव्युत्तरसाठी २९ हजार १५६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत.

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ २६ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर सभागृह, दीक्षांत सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी विविध विद्याशाखांमधील पदवी आणि पदव्युत्तर अशा १ लाख ६८ हजार २३९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये ९० हजार ३९३ विद्यार्थिनी तर ७७ हजार ८४६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पदवीसाठी १ लाख ३९ हजार ८३ तर पदव्युत्तरसाठी २९ हजार १५६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत.

दीक्षांत समारंभामध्ये मानव्यविज्ञान शाखेसाठी १९ हजार ७८४, आंतरविद्याशाखेसाठी ८०३२, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेसाठी ८८ हजार ४०२ आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी ५२ हजार ०२१ पदव्यांचा समावेश आहे. विविध विद्याशाखेतील ४१३ विद्यार्थ्यांना पी.एचडी आणि एमफिल पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. तर प्रा. अविनाश बिनीवाले यांना डी.लीट आणि डॉ. नारखेडे यांना डी.एस्सी पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे.

- Advertisement -

येथे पाहता येणार कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या १४ विद्यार्थ्यांना १९ पदकं बहाल करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर २ पारितोषिकं हे कुलपती पी. सी. अलेक्झांडर यांच्या नावे आणि एक कुलपती पदक बहाल करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. जी. सतीश रेड्डी यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्रं वितरीत करण्यात येतील. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर करण्यात येणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -