घरमुंबईवाहतूक, नालेसफाई कंत्राटदाराच्या हाती फांद्यांची छाटणी

वाहतूक, नालेसफाई कंत्राटदाराच्या हाती फांद्यांची छाटणी

Subscribe

शास्त्रोक्त छाटणीऐवजी झाडांना करणार बोडके

मुंबईतील झाडांच्या धोकादायक फांद्यांची तसेच मृत झाडांची कापणी करण्यासाठी २४ विभागांमध्ये स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. परंतु मागील वेळेस आरबोरिस्टच्या देखरेखीखाली झाडांच्या फांद्यांची कापणी करणे बंधनकारक केल्यामुळे जुन्या कंत्राटदारांनी राजकीय वजन वापरून ही निविदाच रद्द करायला लावली होती. त्यामुळे ही अट काढून टाकल्यानंतर मागवलेल्या या निविदांमध्ये चक्क ३५ टक्क्यापर्यंत कमी बोली लावून वाहतूक कंपन्या आणि नालसफाईची कामे करणार्‍या कंत्राटदारांनी झाडांच्या छाटणीची कामे मिळवली आहेत. त्यामुळे आता मुंबईत शास्त्रोक्तऐवजी लाकडांसाठी झाडांना बोडके करत फांद्यांची छाटणी केली जाण्याची शक्यता आहे.

मुंंबईतील झाडांच्या धोकादायक फांद्यांची तसेच मृत झाडांची कापणी पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येते. त्यामुळे यंदा पावसाळापूर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी निविदा मागवताना आरबोरिस्टच्या देखरेखीखाली आणि यांत्रिकी शिडीचा वापर करण्याची अट कंत्राटात घालण्यात आली होती. या माध्यमातून शास्त्रोक्तपणे झाडांची छाटणी करण्यात येणार होती. परंतु यावर हरकत घेण्यात आली. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून ही निविदा रद्द करण्याची मागणी केली. त्यानुसार या अटी वगळून फेर निविदा मागवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यानुसार नवीन निविदा मागवण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

मुंबईतील २४ विभागांसाठी १२० कोटींच्या अंदाजित रकमेनुसार मागवण्यात आलेल्या या निविदेमध्ये पुन्हा जुन्याच कंत्राटदारांनी ३५ टक्क्यांपर्यंत कमी बोली लावूून कामे मिळवली आहेत. २४ विभाग कार्यालयांसाठी निश्चित करण्यात आलेल्या या कंत्राटात वाहनांचा पुरवठा करणार्‍या ४ कंपन्या तर ७ नालेसफाईचे काम करणार्‍या कंपन्या पात्र ठरल्या आहेत. झाडांच्या फांद्यांची छाटणी करणारे सर्व कंत्राटदार जुनेच असून यापूर्वी त्यांनी लाकडांसाठी झाडे खोडापर्यंत कापून त्यांना बोडके करण्याचा प्रयत्न केला होता. बॉक्स

असे कंत्राटदार कसे चालतील
रस्ते कंत्राट कामांमध्ये २५ टक्के कमी बोली लावणार्‍या कंपन्यांना कंत्राट न देता नव्याने निविदा मागवण्याचा प्रयत्न अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला होता. परंतु या निविदेमध्ये सात कंत्राटदारांनी २५ टक्क्यांपेक्षा कमी बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या कंपन्यांची कंत्राटे रद्द होतील, असा सवाल उपस्थित होत आहे. आर-मध्य, के-पूर्व, पी-दक्षिण, आर-उत्तर,एम-पूर्व, एम-पश्चिम, एन आदी भागांमध्ये सर्वात कमी बोली लावून त्यांनी काम मिळवलेली आहेत.

- Advertisement -

वाहतूक करणार्‍या कंपन्या :
पॉप्युलर ट्ान्सपोर्ट, खांडेश्वर टोविंग, एस.पोळ इंटरप्रायझेस, कमला कंस्ट्क्शन

नालेसफाईची कामे करणारे कंत्राटदार:
तनीशा एंटरप्रायझेस, एम.बी.ब्रदर्स, भुपती असोशिएट, सी.एन.लाधानी एंटरप्रायझेस, मानसी कंस्ट्क्शन, पार्श्व कार्पोरेशन, निरमा कंस्ट्क्शन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -