घरमुंबईआरोग्य सेविकांचा संप अखेर तिसऱ्या दिवशी मागे!

आरोग्य सेविकांचा संप अखेर तिसऱ्या दिवशी मागे!

Subscribe

मागील तीन दिवस आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मुंबईतील आरोग्य सेविकांनी बुधवारी थेट मंत्रालयासमोर धडक दिली.

आरोग्य सेविकांनी पुकारलेला बेमुदत संप आज अखेर तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी पालिकेच्या आरोग्य सेविकांनी गेल्या ३ दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारले होते. मात्र, हे आंदोलन आता मागे घेण्यात आले असून, गुरुवारपासून आरोग्य सेविका पुन्हा एकदा कामावर रुजू होणार आहेत. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ‘सेविकांच्या मानधनाचा विषय स्थायी समितीत मांडला जाईल’, असं आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्याच्या निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात प्रशासनाने पुढील एक महिन्याच्या वेळ मागितला आहे. मागील तीन दिवस आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मुंबईतील आरोग्य सेविकांनी बुधवारी थेट मंत्रालयासमोर धडक दिली. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या आरोग्यसेविका मंत्रालयासमोर ठिय्या देऊन बसल्या होत्या.

मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन

मुंबईत लसीकरण आणि इतर आरोग्य सेवा पुरवणाऱ्या आरोग्य सेविकांना महिन्याला पाच हजार रुपये मानधन मिळते. हे मानधन १३ हजार रुपये करावे, अशी आरोग्य सेविकांची मागणी आहे. तीन दिवस आझाद मैदानात आंदोलन करूनही सरकारने लक्ष न दिल्याने अखेर शेकडो आरोग्यसेविकांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी थेट मंत्रालय गाठले. या शेकडो आरोग्यसेविकांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन सुरू केल्याने पोलिसांची देखील तारांबळ उडाली. जोपर्यंत या महिला पुन्हा मैदानात जात नाहीत तोपर्यंत त्यांच्या शिष्टमंडळाला मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्यामुळे महिला आंदोलनासाठी पुन्हा मैदानाकडे निघून गेल्या.

- Advertisement -

२८ जानेवारी, २०१९ पासून मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला होता. मुंबई महापालिकेने आंदोलन मागे घेण्याची नोटीस जारी केल्यानंतरही आरोग्य सेविकांनी आंदोलन कायम ठेवले होते. त्यानंतर या आरोग्य सेविकांनी थेट मंत्रालयावर धडक दिली. मात्र, त्यांना तिथून माघार घ्यावी लागली.

आरोग्य सेविकांच्या संपाची दखल घेत पालिका आयुक्तांनी बैठक घेतली. पालिका प्रशासनाने आमच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. आरोग्य सेविकांना महिना १५ हजार वेतन आणि भरपगारी प्रसूती रजा देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. आम्हाला अद्याप लेखी आश्वासन मिळालेले नाही. मात्र, तरी आम्ही संप मागे घ्यायचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाला आमच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे आता आरोग्य सेविका पुन्हा कार्यरत होतील.– अॅड. प्रकाश देवदास, महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -