घरCORONA UPDATEगणेशोत्सवासाठी आरोग्य मंत्र्यांच्या सूचना; 'हे' नियम पाळणे असणार बंधनकारक

गणेशोत्सवासाठी आरोग्य मंत्र्यांच्या सूचना; ‘हे’ नियम पाळणे असणार बंधनकारक

Subscribe

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यंदा कोरोनाच्या संकटकाळात सण-उत्सवांवर बंधनं आली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. ते म्हणाले की, सार्वजनिक गणपती कमीत कमी बसवा, तसेच सर्व सार्वजनिक मंडळांना सॅनिटायझर वापरणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. गणेशोत्सवासंदर्भात जिल्ह्यांमध्येही बैठका सुरू असून रुग्णालंयासंदर्भात जिल्हा बैठकीत चर्चा होणार असल्याचे आरोग्य मंत्री म्हणाले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत सार्वजनिक गणपती, गणपती मुरवणुका याबाबतच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच, कोरोनाविरोधात लढा आणि अडचणी यावरही चर्चा झाल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा झाली.

- Advertisement -

सार्वजनिक गणपती कमीत कमी बसतील त्यावर लक्ष द्यावे, आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीवर मर्यादा हवी, सामाजिक उद्देश घेऊन गणेशोत्सव साजरा व्हावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती, समाज प्रबोधन यावर भर द्यावा. राज्य सरकारने लोकहिताचे जे निर्णय घेतले आहेत त्याची माहिती गणेशोत्सव मंडळानी द्यावी, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा –

आदित्य ठाकरे आणि रिया यांचा एकमेकांशी संबंध आहे का? वकिलांनी केला खुलासा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -