घरमुंबईमुंबईकर पितात भेसळयुक्त दूध

मुंबईकर पितात भेसळयुक्त दूध

Subscribe

गेल्या एका वर्षात मुंबईत अनेक ठिकाणांहून भेसळयुक्त दूधाची विक्री होत आहे. गेल्या वर्षभरात २ हजारांहून अधिक लीटर भेसळयुक्त दूध नष्ट केल्याची जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत दिली.

सध्या दूधात भेसळ होऊन दूध विक्री होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत गेल्या वर्षभरात २ हजार २१८ लीटर भेसळयुक्त दुधाचा साठा नष्ट करण्यात आला आहे. एफडीए म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईत अशा आतापर्यंत अनेक कारवाया केल्या असून भेसळ होण्याचं प्रमाण कायम आहे.

मुंबईत भेसळयुक्त दुधाची विक्री

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनीही माहिती विधान परिषदेत दिली आहे. दिवसाची सुरूवात झाली की प्रत्येकाला चहा- कॉफी घ्यायची सवय असते. पण, या चहा – कॉफीमध्ये वापरलं जाणारं दूध नेमकं कुठून येतं हे माहित नसतं. पण, गेल्या एका वर्षात मुंबईत अनेक ठिकाणांहून भेसळयुक्त दूधाची विक्री होत आहे. गेल्या वर्षभरात २ हजारांहून अधिक लीटर भेसळयुक्त दूध नष्ट केल्याची धक्कादायक माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत दिली.

- Advertisement -

मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम

मुंबईत होणाऱ्या भेसळयुक्त दुधाच्या विक्रीबाबत विधान परिषदेत माहिती देण्यात आली. या दुधाच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. याला आळा घालण्यासाठी सरकार काय करत आहे ? असा तारांकित प्रश्न अनिल परब यांनी विधान परिषेदत विचारला होता.

भेसळयुक्त दुधाविरोधात विशेष मोहीम

या प्रश्नावर उत्तर देताना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं की, ‘‘ राज्यात दुधात भेसळ होत असल्याच्या अनेक तक्रारी अन्न आणि औषध विभागाच्या (एफडीए) अन्न विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर एफडीएद्वारे भेसळयुक्त दूध विक्रीविरोधात मुंबईत विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेतंर्गत ८ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. २ हजार २१८ लीटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय संबंधितांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर, सात प्रकरणांविरोधात न्यायनिर्णय खटले दाखल करण्यात आले आहेत. ’’

“ दुधात भेसळ आणि अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याबाबत विधेयक २०१८ च्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात पारीत करण्यात आला असून विधेयक राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी केंद्र सरकारला पाठवण्यात आले आहे. ’’ असंही रावल यांनी लेखी उत्तरात नमूद केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -