घरताज्या घडामोडीमुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण; विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात

मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण; विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात

Subscribe

मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईसह आसपासच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.

मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईसह आसपासच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहरात सोमवारी रात्री पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. तर, मुंबईत उपनगरांत तुरळक सरी बरसल्या. (Heavy rainfall in Mumbai)

मुंबईत सर्वत्र अंधार झाला असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. जोरदार पावसामुळे रस्ते वाहतुकीला अडथळे येत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागंत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुंबईच्या सीएसएमटी भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. भायखळासह लालबाग, दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, परळ, अंधेरी, मालाड, चेंबूर, ठाणे आणि नवीमुंबई परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

मुंबईतील काही भागात मंगळवारी सकाळीही पावसाचा मुक्काम होता. पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

- Advertisement -

मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. कडक उन पडल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. दरम्यान, सोमवारी कुलाबा, सीएसएमटी, भायखळा, मलबार हिल या भागात मुसळधार पाऊस पडला. या भागात १० मि.मी. ते ४० मि.मी. पावसाची नोंद झाली. तर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात तुरळक सरी बरसल्या. ५ मि.मी. ते १५ मि.मी. पावसाची नोंद झाली.

मागच्या 24 तासांत कुलाबा 50, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी प्रत्येकी 40, खालापूर, डहाणू प्रत्येकी 30. पंढरपूर 50, कागल, आजरा 40 प्रत्येकी, शेगाव 30. हिंगोली 60, अंबड, मानवत प्रत्येकी 50, पैठण, मंथा, लातूर प्रत्येकी 40, पाथरी, वसमत, शिरूर, अनंतपाळ, गंगापूर, उदगीर, सेलू, परळी वैजनाथ, चाकूर प्रत्येकी 30. तुमसर, हिंगणघाट, चांदूर रेल्वे, दिग्रस प्रत्येकी 40, काटोल, कळंब, चंद्रपूर, सावळी, नरखेडा, महागाव, सडक अर्जुनी, वर्धा, देवरी, बाभूळगाव प्रत्येकी 30 मिमी पावसाची नोंद झाली.


हेही वाचा – राजस्थानचे गृह राज्यमंत्री राजेंद्र सिंह यादवांशी संबंधित 53 ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाचे छापे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -