घरमुंबईकेडीएमसीचा क्रीडा विभाग बनला हायटेक

केडीएमसीचा क्रीडा विभाग बनला हायटेक

Subscribe

23 हजार 146 विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी

कल्याण डोंबिवली महापालिका ही देशातील पहिली संगणकीय महापालिका म्हणून ओळखली जाते. मात्र त्याच काळाची पावले ओळखत पालिकेतील क्रीडा विभागानेही तंत्रज्ञानाची कास धरली आहे. आता महापालिकेतील क्रीडा विभागही हायटेक झाला. पालिकेत जिल्हास्तरीय शालेय स्पर्धांच्या नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. यंदाच्या वर्षी सुमारे 23 हजार 146 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. ऑनलाईन पद्धतीमुळे गैरप्रकारांना आळा बसल्याने खेळात पारदर्शकता आली आहे.

पालिकेतील क्रीडा अधिकारी आर. के. मुकणे यांनी दोन वर्षापूर्वी पदभार स्वीकारत हायटेक तंत्राचा वापर करण्यावर भर दिला आहे. 2018-19 च्या शैक्षणिक वर्षात जिल्हास्तरावर 55 खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. ऑनलाइन पध्दतीने सुमारे 23 हजार 146 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापूर्वी क्रीडाशिक्षकांना शाळेतील प्रत्येक खेळाची सांघिक आणि वैयक्तिक प्रवेशिका भरून घेऊन ती टाईप करावी लागत होती. ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमुळे शाळांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थी संख्या त्यातील मुले आणि मुलींची संख्या, खेळातील त्यांचा सांघिक आणि वैयक्तीक सहभाग याची नोंद करता येते. तसेच खेळाडूंची वैयक्तिक व सांघिक माहिती मिळाल्याने विद्यार्थ्याचा नेमका कोणत्या खेळात सहभाग आहे याची माहिती उपलब्ध होत आहे. तसेच खेळाडूची जन्मतारीख नोंद केल्यानंतर ती कायम राहणार असल्याने, वय कमी करून खेळाडू खेळवण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. खेळाडूचा फोटो असल्याने डमी विद्यार्थी खेळवण्याच्या प्रकाराला चाप बसला आहे.

- Advertisement -

क्रीडा विभाग ऑनलाईन झाल्याची जिल्हातील ही पहिलीच महापालिका असावी त्यानंतर अनेक महापालिकांनी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरूवात केला आहे. ऑनलाईन पद्धतीमुळे गैरप्रकारांना आळा बसला आहे. तसेच प्रत्येक खेळाडूची वैयक्तिक माहितीही वेबसाइटवर सेव्ह राहते.
-आर. के. मुकणे, क्रीडा अधिकारी, केडीएमसी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -