घरनवी मुंबईSwachh Sarveskshan 2020 : देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसऱ्या...

Swachh Sarveskshan 2020 : देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसऱ्या क्रमाकांवर

Subscribe

सलग चौथ्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून मध्य प्रदेशातील इंदूर शहराची निवड करण्यात आली आहे तर तर दुसऱ्या स्थानी गुजरातमधील सूरत शहराची निवड करण्यात आली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील नवी मुंबई शहर सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवडण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’मध्ये परिणामांची घोषणा केली. या दरम्यान स्वच्छतेसाठी उत्तम उपाययोजना करणाऱ्या शहरांचाही गौरव करण्यात आला आहे.

- Advertisement -

स्वच्छता सर्वेक्षण 2020 मध्ये एक लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या कॅटगरीमध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूरची निवड करण्यात आली आहे. स्वच्छता सर्वेक्षणाच्या पहिल्या आवृत्तीत म्हैसूरला भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळाला होता. त्यानंतर सलग तीन वर्ष २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये मध्यप्रदेशातील इंदूर शहराला सर्वात स्वच्छ शहराचा मान देण्यात आला होता. तसेच यावर्षीही सलग चौथ्यांदा इंदूरने हा मान पटकावला आहे.

यासह केंद्र सरकारने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ या स्वच्छ शहरांच्या वार्षिक सर्व्हेचा निकाल जाहीर केला. यात १ लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या टॉप ३ स्वच्छ शहरं ही महाराष्ट्रातील आहेत. या यादीत पहिला क्रमांकावर साताऱ्यातील कराड, दुसऱ्या क्रमांकावर पुण्यातील सासवड, तर तिसऱ्या क्रमांकावर लोणावळा शहराचा समावेश आहे. त्याशिवाय या यादीत पन्हाळा, जेजुरी, शिर्डी यासारख्या इतर शहरांचा समावेश आहे.

- Advertisement -

एक लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत देशातील २५ शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील २० शहर ही महाराष्ट्रातील आहेत. तर छत्तीसगडमधील ३, पंजाब आणि मध्यप्रदेशातील अनुक्रमे एका शहरांचा समावेश आहे.

स्वच्छ शहरांची क्रमवारी

1. इंदूर (मध्य प्रदेश)
2. सुरत (गुजरात)
3. नवी मुंबई (महाराष्ट्र)
4. अंबिकापूर (छत्तिसगढ)
5. म्हैसूर (कर्नाटक)
6. विजयवाडा (आंध्रप्रदेश)
7. अहमदाबाद (गुजरात)
8. नवी दिल्ली (दिल्ली)
9. चंद्रपूर (महाराष्ट्र)
10. खारगोने (मध्य प्रदेश)


निवृत्तीमुळे भारतीय निराश; पंतप्रधान मोदींचं धोनीला भावनिक पत्र
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -