घरमुंबईव्यसनाधीन पतीची अल्पवयीन मुलाच्या मदतीने हत्या

व्यसनाधीन पतीची अल्पवयीन मुलाच्या मदतीने हत्या

Subscribe

आकस्मित मृत्यूचा बनाव उघडकीस

व्यसनाधीन पतीची मारहाण, घरातील दागिने, पैसे जबरदस्तीने घेऊन जाण्याचा वारंवार होत असलेला प्रकार यामुळे कंटाळलेल्या एका महिलेने आपल्या पंधरा वर्षीय मुलाच्या मदतीने पतीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर दारुच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा बनावही केला. पण, शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे खरे कारण उजेडात आल्यावर पोलिसांनी पत्नीला तिच्या अल्पवयीन मुलासह खुनाच्या गुन्ह्यात अटक केली.

वालीव मराठी शाळेच्या पाठीमागे असलेल्या रमेश माळवी इमारतीत राहणार्‍या अंकुश चव्हाण (45) याचा दारुच्या अतिसेवनामुळे शनिवारी रात्री बाराच्या सुमारास मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या पंधरा वर्षीय मुलाने वालीव पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी अंकुश चव्हाण यांच्या मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता. शवविच्छेदन अहवालात अंकुशचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी अंकुशची पत्नी शोभा, तिची मुलगी आणि पंधरा वर्षीय मुलाची कसून चौकशीत केली. त्यानंतर खूनाचा उलगडा झाला.

- Advertisement -

अंकुशला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यात तो पत्नी आणि मुलीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. दारू पिण्यासाठी घरातील दागिने विकत असे. घरातील पैसे नेत असे. इतकेच नाही तर पत्नीसह मुलांना मारहाण करीत असे. या प्रकारामुळे शोभा त्रस्त झाली होती. अखेर शनिवारी रात्री अंकुश पिऊन घरी येऊन झोपल्यानंतर शोभाने मुलाच्या मदतीने ओढणीने गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर अंकुशचा मृतदेह व्हरांड्यात आणून टाकला होता. अंकुशचा दारुच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याचा त्यांनी केलेला बनाव शवविच्छेदन अहवालामुळे उजेडात आला. पोलिसांनी शोभा आणि तिच्या अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -