घरमुंबईतेव्हा माझ्याकडे पिस्तूल नव्हते; आमदार सदा सरवणकरांचं स्पष्टीकरण

तेव्हा माझ्याकडे पिस्तूल नव्हते; आमदार सदा सरवणकरांचं स्पष्टीकरण

Subscribe

मुंबई – प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटातील राड्याप्रकरणी आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणीत भर पडली आहे. या आरोपांनंतर आता दादर पोलिसांनी सरवणकर यांच्या जवळील पिस्तुल जप्त केले आहे. यावर शिवसेना नेत्यांच्या दबाबापोटी गुन्हा दाखल झाल्याचे आमदार सदा सरवणकर यांनी एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना केला आहे.

आमदार सदा सरवणकर काय म्हणाले –

- Advertisement -

आम्ही एकाच परिवारातले, झालेला प्रकार दुर्दैवी आहे. आमच्यावर शिवसेना नेत्यांच्या दबावापोटी गुन्हा दाखल झाल असू शकतो. पोलीस स्थानकात गेलो त्यावेळी माझ्याकडे पिस्तुल नव्हते. माझ्या सोबत सिक्युरिटी असते, त्यामुळे मला गोळी झाडण्याची गरज नाही. माझे पिस्तुल मी पोलीस स्थानकात पोलीस स्थानकात दिले आहे. माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मी तपासात सहकार्य करणार, असे आमदार सदा सरवणकर म्हणाले.

नेमके प्रकरण काय – 

- Advertisement -

अनंत चतुर्दशीनिमित्त प्रभादेवी परिसरात गणेश विसर्जन मिरवणुक सुरु होती. यावेळी शिवसेना आणि शिंदे गटातील समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आदेश दिल्यानंतर संघर्ष टाळला. मात्र, शनिवारी हा वाद पुन्हा उफाळून आला. सदा सरवणकर समर्थकांकडून शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न झाला. ज्यानंतर दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाचीही झाली. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह उपस्थित शिवसैनिकांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. ज्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -