घरमुंबईआयआयटीच्या विद्यार्थ्यांची कोट्यावधींच्या पॅकेजची उड्डाणे

आयआयटीच्या विद्यार्थ्यांची कोट्यावधींच्या पॅकेजची उड्डाणे

Subscribe

मायक्रोसॉफ्ट, गुगल, उबरमार्फत भरभरून पॅकेज

यंदाच्या वर्षीही आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी कोट्यावधींची पॅकेज मिळवण्यात बाजी मारली आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक असे २ लाख डॉलर्स म्हणजे जवळपास १.५ कोटी रूपयांचे वार्षिक पॅकेज दिले आहे. कॅलिफोर्नियातील कोहेसिटी या आयटी कंपनीने दीड कोटींचे पॅकेज ऑफर केले आहे. तर ट्रेडिंगमधील एका कंपनीने जवळपास १.४ कोटी रूपयांचे म्हणजे जवळपास १ लाख ५७ हजार युरोचे पॅकेज देऊ केले आहे. तर भारतातील कंपन्यांमध्ये ग्रॅविटॉन ट्रेडिंग, क्वांटबॉक्स या कंपन्यांनी ८० लाख रूपयांपर्यंतचे पॅकेज देऊ केले आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या अॅमस्टरडॅम आणि सिडनी प्रोफाईलसाठी हे पॅकेज देऊ केले आहे.

ट्रेडिंगमध्ये असणाऱ्या ऑप्टीवर या कंपनीने एकुण सात मुलांची निवड केली आहे. तर काहींची निवड ही सॉफ्टव्हेअर आणि क्वांट रिसर्चसाठी करण्यात आली आहे. येत्या दिवसात आणखी मुलाखतीही घेण्यात येणार आहेत. भारतातील कंपन्यांनी आयआयटी बॉम्बे आणि आयआयटी मद्रास येथून काही मुलांना नोकरीसाठीची ऑफर देऊ केली आहे. दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांनी ४६ लाख रूपयांपर्यंतचे पॅकेज ऑफर केले आहे. त्यापाठोपाठ वर्ल्डक्वांट ३९ कोटी तर मॉर्गन स्टॅनलीने ३७ लाख आणि ३५ लाख रूपयांचे पॅकेज उबरमार्फत देण्यात आले आहे. एकुण १८ कंपन्यांनी या प्रक्रियेत भाग घेतला होता. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील विद्यार्थी निवडीच्या प्रक्रियेत मायक्रोसॉफ्ट, गुगल, टेक्सास इन्स्ट्रुमेंट, क्वालकॉम, बोस्टन कंसल्टींग ग्रुप, एपल एण्ड बेन यासारख्या कंपन्या आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांच्या निवडीच्या प्रक्रियेसाठी पुढे आल्या होत्या.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -