घरमुंबईCorona: पुश करो, सॅनिटाईज करो; 'सॅनिटायजेशन बॉक्स'मुळे निर्जंतुकीकरण शक्य

Corona: पुश करो, सॅनिटाईज करो; ‘सॅनिटायजेशन बॉक्स’मुळे निर्जंतुकीकरण शक्य

Subscribe

दैनंदिन व्यवहारासाठी वापरत असलेल्या नोटांपासून ते वॉलेटपर्यंत अशा अनेक गोष्टी या सॅनिटायजेशन बॉक्समध्ये सहज निर्जंतुकीकरण करणे शक्य

आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कोरोनाविरोधातील लढाईसाठी पुन्हा एकदा एक नाविण्यपूर्ण पर्याय देऊ केले आहे. घरच्या घरी सहज आणि कमी किंमतीत उपलब्ध होणारा प्रोटोटाईप (sample\ model) याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपल्या दैनंदिन व्यवहारातील तसेच जीवनावश्यक गोष्टी निर्जंतुकीकरणाचा हा अत्यंत सोपा पर्याय असून व्हायरस फ्री सॅनिटायजेशन बॉक्सच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपच्या माध्यमातून हा पुढाकार घेण्यात आला आहे.

काही क्षणात वस्तूंचे निर्जंतुकीकरण शक्य

आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस विभागाच्या बॅचमधील मुलांच्या पुढाकारातून हा व्हायरस फ्री सॅनिटायजनेशन बॉक्स तयार कऱण्यात आला आहे. दैनंदिन व्यवहारासाठी वापरत असलेल्या नोटांपासून ते वॉलेटपर्यंत अशा अनेक गोष्टी या सॅनिटायजेशन बॉक्समध्ये सहज निर्जंतुकीकरण करणे शक्य आहे. कोरोना व्हायरसचा निर्जंतुकीकरणाचा कालावधी हा तासाहून अधिक आहे. पण या सॅनिटायजनेशन बॉक्समुळे काही वेळातच वस्तूंचे निर्जंतुकीकरण सहज करता येते. आयआयटी मुंबईच्या मानवी धवण, रत्नेश मिश्रा तसेच मनत्सु फाऊंडेशनचा तुषार जाधव आणि अश्तेष कुमार यांनी एकत्र येऊन हा सॅनिटायजेशन बॉक्स तयार केला आहे.

- Advertisement -

बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना केलं क्वारंटाईन

घरातल्या डस्बिनचा यासाठी वापर करण्यात आला आहे. डस्बिनच्या आतल्या बाजुला फॉईल पेपरचा वापर करण्यात आला आहे. तर डस्बिन उघड बंद करण्याची नेहमीसारखीच व्यवस्था आहे. युवीसी लाईटचा वापर यासाठी करण्यात आला आहे. या लाईटचा वापर करून निर्जंतुकीकरण करणे शक्य होते. अवघ्या काही मिनिटांमध्येच निर्जंतुक झालेली उपकरणे ही वापरता येतात. अगदी कमी बजेटमध्ये हा प्रोटोटाईप (sample\ model) तयार करण्यात आला आहे. त्यामुळे याचा घराघरात वापर करणे सहज शक्य होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -