घरCORONA UPDATEअवघ्या ५ दिवसांमध्ये 'दादर-धारावी' कोरोनाग्रस्तांच्या यादीत १७ वरून ५व्या क्रमांकावर

अवघ्या ५ दिवसांमध्ये ‘दादर-धारावी’ कोरोनाग्रस्तांच्या यादीत १७ वरून ५व्या क्रमांकावर

Subscribe

वरळीपाठोपाठ आता आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीसह दादर माहिम या जी-उत्तर विभागातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या जी-उत्तर विभागात १२ एप्रिलपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ७७ वर पोहोचली आहे.

वरळीपाठोपाठ आता आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीसह दादर माहिम या जी-उत्तर विभागातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या जी-उत्तर विभागात १२ एप्रिलपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ७७ वर पोहोचली आहे. यामध्ये धारावीतील कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. पाच दिवसांपूर्वी जी-उत्तर विभाग कोरोनाग्रस्तांच्या क्रमवारीत १७ व्या क्रमांकावर होता. परंतु, अवघ्या पाच दिवसांत या विभागातील वाढती रुग्णांची संख्या पाहता हा विभाग आता पाचव्या क्रमाकांवर आहे.

‘जी-दक्षिण’ विभागात ४० रुग्णांची भर

मुंबईत १२ एप्रिल २०२० पर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा सुमारे १ हजार ४०० वर जाऊन पोहोचला आहे. यामध्ये वरळी-प्रभादेवी ‘जी-दक्षिण’ विभागात आणखी सुमारे ४० रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे येथील रुग्णांची संख्या २८० वर पोहोचली आहे. वरळी कोळीवाडापाठोपाठ जनता कॉलनीत सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. त्याशिवाय आदर्शनगर, बीडीडी चाळ, पोलीस वसाहत या विभागांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. वरळीतील जिजामाता नगर येथे आता रुग्णांची संख्या अधिक वाढल्याने येथील कोरोनाग्रस्तांचा आकडा तिनशे पार होण्याचीही चिन्हे वर्तवली जात आहेत.

- Advertisement -

एम-पूर्व विभागात ८२ रुग्ण

त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर भायखळा, माझगाव, नागपाडा, चिंचपोकळी या ‘ई’ विभागाचा समावेश आहे. या विभागात झुला मैदान परिसरात आणखी काही रुगण आढळून आले असून या विभागातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १२० वर पोहोचली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ग्रँटरोड, मलबारहिल, वाळकेश्वर ‘डि’ विभागाचा समावेश आहे. या विभागात आतापर्यंत ९७ रुग्ण आढळून आले आहेत. भाटीया रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांची संख्या डि विभागात नोंदली गेल्यामुळे ही आकडेवारी वाढल्याचे बोलले जात आहे. देवनार,गोवंडी परिसरातील एम-पूर्व विभागात ८२ रुग्ण तर वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व या एच-पूर्वमध्ये ८० रुग्ण आले आहेत. तर माहिम,दादर,धारावी या जी-उत्तर विभागात ७७ रुग्ण आढळून आले आहेत.

धारावीत ४७ रुग्ण आढळले

आतापर्यंत धारावीत ४७ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरीत कोरोनाग्रस्त रुग्ण हे माहिम आणि दादरमधील आहेत. शुश्रूषा रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांच्या अतिसंपर्कात आलेल्यांना धारावीतील राजीव गांधी क्रिडा संकुल आणि डॉक्टरांना साई रुग्णालयात क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु, याठिकाणी या लोकांची तपासणी न झाल्याने यासर्वांना रुपारेल कॉलेजमधील मुलांच्या वसाहतीमध्ये क्वॉरंटाईनची व्यवस्था केली आहे. तिथे सर्वांची व्यवस्था केली आहे. याबरोबरच मुंबईतील विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम या के-पश्चिममध्ये ७१ रुग्ण, विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व या के-पूर्वमध्ये ६९रुग्ण, कुर्ला एल विभागात ६८ रुग्ण, देवनार, चेंबूर या एम-पश्चिम विभागात ५१ रुग्ण. मालाड पी-उत्तर विभागामध्ये ४९ रुग्ण, भांडुप, कांजूरमार्ग, पवई, विक्रोळी या एस विभागात ४८ रुग्ण, वडाळा, शीव या एफ-उत्तर विभागात ४५ रुग्ण, परळ, शिवडी, लालबाग या एफ-दक्षिण विभागात ३९ रुग्ण, कांदिवली आर-दक्षिण विभागात ३३ रुग्ण, वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम या एच –पश्चिम विभागात ३० रुग्ण, गोरेगाव या पी-दक्षिण विभागात २९ रुग्ण, मस्जिद बंदर, डोंगरी या बी विभागात २६ रुग्ण, कुलाबा, नरिमन पॉईंट, फोर्ट या ए विभागात २६ रुग्ण, घाटकोपर,विद्याविहार या एन विभागात २५ रुग्ण, बोरीवली आर-मध्य विभागात २३ रुग्ण, दहिसर या आर-उत्तर विभागात १२ रुग्ण, चिराबाजार, चंदनवाडी, गिरगाव या सी विभागात ११ रुग्ण, तर मुलुंड या टी विभागात ०८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – विभागातील 17 हजार कर्मचार्‍यांना करोना प्रशिक्षण


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -